अशी माहिती प्रा. अनिल सामंत यांनी म्हापसा येथील इंद्रधनुष्य मिनी सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी व्यासपीठावर नववर्ष समितीचे अध्यक्ष वैभव राऊळ, उपाध्यक्ष प्राची साळगावकर, उपाध्यक्ष अमय नाटेकर, कार्यवाह कौतुभ राऊत व अन्य सदस्य उपस्थित होते. पहाटे ५ वाजता खोली येथील श्री देवी सातेरी मंदिरात नारळ ठेवून व सार्वजनिक ग्राहाणे घालून शोभायात्रेला सुरूवात होईल. तसेच करासवाडा, दत्तवाडी, गणेशपुरी, आंगड, विठ्ठल वाडी, काणकाबांध, शेट्येवाडा, धुळेर, अशा विविध भागातून शोभायात्रेला प्रारंभ होऊन सकाळी ५.३० वाजता श्री मारूती मंदिराजवळ एकत्रिकरण होईल. व तेथून शोभा यात्रा काढण्यात येईल. यात दिंडी पथक, लेझीम पथक, ढोल पथक, मशाल मिरवणूक, महिला पंचारती घेऊन पारंपरिक वेषात सहभागी होतील. नंतर ६ वा योगेश सोमण (प्रसिद्ध लेखक, अभिनेते) यांच्या हस्ते सार्वजनिक गुढी उभारणात येईल व त्या चे ” भारतीय इतिहासाची सोनेरी पाने ” या विषयावर भाषण होईल. संध्याकाळी ६.३० वाजता माहिती आणि प्रसिद्ध खाते पुरस्कृत व विष्णु शिरोडकर निमित स्वर वंदन ” हा भावगीत, भक्तीगीत, नाट्य गीत व देशभक्तीपर गीतांची मैफल होईल. यात गायक कलाकार प्रसन्न तेंडुलकर, समृद्ध बादोंडकर, तनीशा मावजेकर, भाग घेतील. त्यांना संगीत साथ रोहित बादोंडकर, प्रकाश आमोणकर, अवधूत च्यारी, सुशील कुमार दिवेदी, विष्ण शिरोडकर करतील. सुत्रसंचालन मानसी वाळवे करतील .