पंचायत क्षेत्रातील विकासकामे पुर्ण करण्यास व पंचायत क्षेत्रातील विज व पाण्याची समस्या सोडवण्यास असमर्थ ठरल्याच्या कारणावरून हणजूण कायसुवच्या ग्रामस्थांनी सरपंच सावियो अल्मेदा यांना फैलावर घेतले

.

 

पंचायत क्षेत्रातील विकासकामे पुर्ण करण्यास व पंचायत क्षेत्रातील विज व पाण्याची समस्या सोडवण्यास असमर्थ ठरल्याच्या कारणावरून हणजूण कायसुवच्या ग्रामस्थांनी सरपंच सावियो अल्मेदा यांना फैलावर घेतले. सुमारे एक वर्षानंतर घेण्यात घेण्यात आलेल्या ग्रामसभेत फक्त पंचवीस ग्रामस्थ उपस्थित होते.
सुरवातीला पंचायत सचिव धर्मेंद्र गोवेकर यांनी मागील दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या ग्रामसभेचा इतिवृतांत वाचून दाखवला, त्या ग्रामसभेत पुढील ग्रामसभा घेण्यापूर्वी वर्तमान पत्रात जाहिरात द्यावी व लाऊडस्पीकरवरून ग्रामसभेबद्दल जागरूकता आणावी असा ठराव घेण्यात आलेला असताना आजच्या ग्रामसभेबद्दल तसे का करण्यात आले नाही असे विचारण्यात आले असताना पुढील ग्रामसभेपुर्वी तसे केले जाईल असे सरपंचानी संगितले. वागातोर पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी वाहतूक पोलीस ठेवावा म्हणून त्या ग्रामसभेत ठराव घेण्यात आला होता पण सरपंचाने या ठरावर वर्षभरात काहीच कारवाई न केल्याने वाहतूक खात्याला कळवा अशी ग्रामस्थानी पुन्हा विनंती केली. तसेच पंचायत गृहजवळ ग्रामस्थांना स्वछता गृह ( टॉयलेट ) उपलब्ध करावे असा ठरावही मागच्या ग्रामसभेत घेण्यात आला होता पण वर्ष होऊनही पंचायतीने कोणतीही कृती न केल्याबद्दल जाब विचारण्यात आला.
यावेळी पंचायत सचिवाने 2022-2023 सालाकरिताचा 9 करोड 39 लाख 82 हजार 43 रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असता संमत करण्यापूर्वी ग्रामस्थांना सूचना करण्यासाठी तो पंचायत सूचना फलकावर लावण्यात यावा अशी सूचना ग्रामस्थ रमेश नाईक यांनी केली. यावेळी हणजूण कायसूव जैव विविधता समितीचे अध्यक्ष मायकल डिसोझा यांनी पंचायत क्षेत्रात होणाऱ्या झाडे कत्तलीची माहिती वनखात्याकडून पंचायतीला दिली जाते पण पंचायत ती माहिती समितीला देत नाहीत असा आरोप केला.
शापोरा कायसूव किनाऱ्यावरील मासेमार बांधवाची घरे व जेटीचा सहभाग सीझेडएमपी आराखड्यात सहभाग करण्यास भाग पाडावे, पाणी प्रश्न उग्र असल्याने मोठ्या व्यवसायिक प्रकल्पाना परवाने देऊ नये, कुंभारवाडा, हणजूण येथील वायनार प्रकल्पातून शेतात सोडण्यात येणाऱ्या सांडडपाण्याचे सर्वेक्षण करणे, पंचायत क्षेत्रात वनखात्याने झाडे कापण्यासाठी दिलेल्या परवान्याची माहिती जैव विविधता समितीला देणे आदी ठराव ग्रामसभेत घेण्यात आले.
ग्रामसभेत झालेल्या या चर्चेत मायकल डिसोझा, रवी हरमलकर, रमेश नाईक, सत्यवान हरमलकर, सागर भोसले, अंकित साळगावकर आदिनी सहभाग घेतला.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar