म्हापसा येथील श्रीदोरा काकुलो वाणिज्य व मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालयाचा एन. एस. एस. विभागातफै रीपोर्ट राइटिंग ( वृतांत लेखन) या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली

.

म्हापसा येथील श्रीदोरा काकुलो वाणिज्य व मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालयाचा एन. एस. एस. विभागातफै रीपोर्ट राइटिंग ( वृतांत लेखन) या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी पत्रकार भारत बेतकेकर यांनी वृतांत लेखन कसे करावे, बातमीची व्याख्या, पत्रकार कसा असावा, वृत्तपत्रासाठी लेखन करताना कोणते मुद्दे लक्षात ठेवावेत याविषयी माहिती दिली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की बातमी हा वृतपत्राचा प्राण असतो, बातमी हा समाजाचा आरसा असतो, त्यासाठी बातमी लिहिताना काळजी घ्यावी लागते. त्यानी यावेळी बातमी कशी लिहावी, बातमी साठी आवश्यक गोष्टी कोणत्या याविषयी विद्यार्थीना मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर काॅलेजच्या उपप्राचार्य डॉ शर्मिला बोरकर, नीता नास्ननोडकर, डॉ. स्मिता श्रीवास्तव, एन. एस. एस, विभाग प्रमुख प्रकाश ताम्हणकर आदी उपस्थित होते. डॉ. बोरकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात चांगला वाव असून या क्षेत्रात युवकांना चांगली संधी असलाचे सागितले. प्रा. ताम्हणकर यांनी विधाथीना या क्षेत्रात करिअर करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश ताम्हणकर यांनी व त्यांनीच आभार मानले. या कार्यशाळेचा लाभ २० विधाथीनी घेतला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar