हरमल पंचक्रोशी हायस्कूल च्या निवृत्त शिक्षिका सौ. प्रज्वला सावंत यांना हायस्कूल तफै निरोप समारंभ देण्यात आला.
हरमल पंचक्रोशी हायस्कूल येथे झालेल्या निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता पासैकर, हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गोविंदराज देसाई, जेष्ठ शिक्षक उदय परब, सुनेत्रा सावंत उपस्थित होत्या.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तदनंतर शिक्षक वर्गाने गीत सादर केले. विद्यार्थी कु. शौनक पै व रीलेखा नाईक यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षकाच्या वतीने उदय परब, प्रसाद शेटगावकर, माधवी कुंभार व गौरेश पावसकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सौ. सांवत यांनी ३७ बषै या संस्थेमध्ये शिक्षण देणाचे कार्य उत्तम प्रकारे पार पाडले. तिचा आदर्श मागून येणाऱ्या नवीन पिढीतील शिक्षकांनी ध्यावा व ज्ञानाचे कार्य चालू ठेवावे. मुलांना शिक्षण देताना त्यांनी आपल्या कुटुंबासाठीही वेळ दिला असे सांगताना त्यांनी त्याना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका स्मिता पासैकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की सुनेत्रा सांवत या आपल्या जिवलग मैत्रीण होत्या व खास मैत्रीण म्हणून राहणार असे सांगताना त्या भावनावश झाल्या. आम्ही ३५ बषै एकमेकाच्या सहवासात राहीलो. आमच्या आवडी निवडी एक होत्या. दोघांनी एकमेकांना साथ दिली व ही साथ कायम राहणार असल्याचे सांगितले. जीवनाच्या प्रवासात त्या आपल्या सोबत कायम राहिला, त्याच्या निवृत्त होणारे जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरुन काढणे अशक्य आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सौ. सांवत यांनी हायस्कूल च्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली व मला हायस्कूल मध्ये शिकवायला संधी दिल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी निवृत्त शिक्षिका प्रज्वला सावंत यांचा पासैकर यांच्या हस्ते श्रीफळ, शाल व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिक्षिका ज्योती वळवईकर व इतरानी औक्षण केले. या निरोप समारंभाला सौ. सावंत यांचे पती प्रदीप सावंत, बहिण मंजुषा जोशी व त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. पती श्री. सावंत व बहीण सौ. जोशी, मुलगी प्राची यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी हायस्कूल च्या शिक्षिकांनी एक आगळावेगळा हिंदी सिनेमा वर आधारित गाणी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा बाधंकर तर ज्योती वळव ईकर यांनी आभार मानले.
हरमल पंचक्रोशी हायस्कूल च्या निवृत्त शिक्षिका सौ. प्रज्वला सावंत यांना हायस्कूल तफै निरोप समारंभ देण्यात आला

.
[ays_slider id=1]