डॉ. सावंत यांचा न भूतो… शपथविधी सोहळा – गोव्याच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्र्यांची उपस्थिती

.

डॉ. सावंत यांचा न भूतो… शपथविधी सोहळा

– गोव्याच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्र्यांची उपस्थिती

आज सोमवारी डॉ. प्रमोद सावंत हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह नऊ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहण्याची ही गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. इतकेच नव्हे तर देशाचे गृहमंत्री, संरक्षण मंत्री, इतर केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय नेते आणि नऊ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे डॉ. सावंत यांचा शपथविधी सोहळा राज्याच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिला जाईल. न भूतो म्हणता येईल अशा सोहळ्यास अंदाजे १० हजारांपेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा याची देही, याची डोळा साठवण्यासाठी केवळ गोवाच नव्हे तर, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली आदी राज्यातील लोक उपस्थित राहणार आहेत.
राजधानी पणजी येथील शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी गोव्यात दाखल झाले आहेत.
डॉ. प्रमोद सावंत, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, गोव्याचे प्रभारी सी टी रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे, संघटनमंत्री सतिश धोंड यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. हा सोहळा केवळ न भूतो न ठरता न भविष्यती व्हावा यासाठी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि संघटन अहोरात्र काम करत आहेत.
गोवा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून १८ दिवस झाले. देशातील ५ राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांत भाजपाने यश मिळवले. संपूर्ण देशासह गोव्यात होणारा शिमगोत्सव आणि होळी यामुळे इतर राज्यांतील शपथविधी सोहळा थोडा उशिरा पर पडला.आज आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडेल.
या निवडणुकीत गोमंतकीय जनतेने भाजपाच्या पारड्यात आपले दान टाकले. विधानसभेच्या एकूण ४० पैकी २० जागांवर भाजपचे उमेदवार आमदार म्हणून निवडून आले. तीन अपक्ष आणि मगो पक्षाने भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर पुढील पाच वर्षांसाठी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार कार्यरत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रमोद सावंत पुन्हा राज्याची धुरा वाहतील.
स्व. मनोहर पर्रीकर आणि त्यांच्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने गेल्या दहा वर्षांत राज्याचा मोठा विकास घडवून आणला. शास्वत विकास, स्थिर सरकार आणि पारदर्शक कारभार हे भाजपचे धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतत्वाखालील केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो दोन्ही पातळीवर भाजपाने राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास साधला आहे. यामुळेच उत्तर प्रदेश या सर्वांत मोठ्या राज्यासह गोवा मणिपूर, उत्तराखंड या राज्यातील जनतेने भाजपाला स्पष्ट बहुमत दिले.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या शपथविधी सोहळ्यास तत्कालीन उपराष्ट्रपती झाकीर हुसेन उपस्थित राहिले होते. तो सोहळा वगळता गेल्या ६० वर्षांत मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास राष्ट्रीय नेते किंवा मान्यवर उपस्थित नव्हते. म्हणूनच डॉ. सावंत यांचा शपथविधी सोहळा आगळा वेगळा ठरतो. यामुळेच या सोहळ्याची इतिहासात सुवर्णाक्षरांत नोंद होईल, यात शंका नाही.
गोव्यात पुन्हा भाजपची डाळ शिजणार नाही, अशा आवया विरोधक उठवत होते. तसेच लोकांना अव्वाच्या सव्वा आणि कधीही पूर्ण करता येणार नाहीत अशी आश्वासने देत सुटले होते. पण याउलट भाजपाने कोणतीही भली मोठी आणि खोटी आश्वासने न देता केवळ स्थैर्य आणि शास्वत विकासासाठी लोकांना आवाहन केले. अर्थातच विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता गोमंतकीय जनतेने भाजपाच्या विकासास आपले मोलाचे योगदान दिले. याबद्दल तमाम गोमंतकीय जनतेने आभार. तसेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असलेले डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या नूतन मंत्रिमंडळास लाख लाख शुभेच्छा….!!

– संदेश साधले,
समन्वयक,
प्रसार माध्यम विभाग,
गोवा – भाजपा

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar