देवी भगवती प्रभू पंचायतन कामुलकर संस्थान झरूळे तुये येथील शिमगोत्सव २८ पासून सुरू झाला असून दिनांक ३१ रोजी शिबिकोसव त्या प्रित्यर्थ सकाळी ९ वाजता धार्मिक विधी व रात्रो ८.३० वाजता सुवारी ( घुमट वादन) रात्रौ ११ वाजता सुवारी वादनासह श्री ची पालखी मिरवणूक, श्री भगवती सातेरी वेतोबा मंदिरात प्रदक्षिणा घालून श्रीच्या पालखीचे आगमन भगवती मंदिरात होईल. तदनंतर फळफळावळची पावणी, रात्रौ १२ वाजता दशावतारी संगीत पौराणिक नाटक. शुक्रवार १ रोजी सकाळी १० वाजता श्री प्रभू मंदिर वागाळी येथे सुवारी वादन होऊन श्रीचा कौल व तिथप्रसाद होईल रात्रौ ८ वाजता भगवती मंदिरात सुवारी वादन व पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम होईल. दिनांक २ रोजी सकाळी ९ वाजता सुवारी वादन, गुलाल उधळण ( धुळवड) व तदनंतर श्री प्रभू पंचायतन तफै कौल होईल, गुढीपाडवा निमित्त श्रीस धार्मिक नुतन वर्षारंभास संदेश वाचून आरती व तिथप्रसाद होऊन.