पर्रा पंचायतीच्या सरपंचपदी जोस्पिन डिक्रुझ यांची बिनविरोध निवड करण्यात आली

.

 

माजी सरपंच डिलायला लोबो यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पर्राच्या सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. सरपंच पद रिक्त झाल्यानंतर आज सरपंच पदाकरिता निवडणूक घेण्यात आली. सात पंचसदस्य असलेल्या या पंचायतीच्या उपसरपंच असलेल्या जोस्पिन डिक्रुझ यांचा एकमेव अर्ज सरपंचपदाकरिता आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आमदार तथा पंचसदस्य डिलायला लोबो व आमदार मायकल लोबो यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने आपण पंचायत क्षेत्रातील विकासकामे पुर्ण करणार असे सरपंच झाल्यानंतर जोस्पिन डिक्रुझ यांनी सांगितले. सरपंच झाल्याबद्दल जोस्पिन डिक्रुझ यांचे आमदार मायकल लोबो व आमदार डिलायला लोबो यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar