पुरुष प्रधान समाजात महिलांना उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेताना खूप अडथळे पार करावे लागतात. आपला व्यवसाय स्थिर होई पर्यत आपल्या कुटूंबीयांची साथ महत्वाची असते.आजच्या महिलांनी उद्योग व्यवसायात येऊन आपली कर्तबगारी दाखवली पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध महिला उद्योगिनी सौ. गिरीजा अग्रवाल यांनी म्हापसा येथे केले.
येथील तुळशीराम हॉल मध्ये अंतरराष्ट्रीय वैश्य महासभा गोवा विभागाच्या महिला शाखेने महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित संमेलनात ” यशस्वी उद्योगिनींचा प्रवास ” या विषयावर प्रमुख पाहुण्या या नात्याने त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी दक्षिण गोवा वैश्य संघटना महिला शखेच्या अध्यक्षा प्रज्ञा कुडतरकर, म्हापसा वैश्य संघटनेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा रुपाली गवंडळकर, अंतरराष्ट्रीय वैश्य महासभेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा ऍड. सिद्धी पारोडकर, वैश्य महिला उद्योगिनी समूहाच्या अध्यक्षा शालमा शिरोडकर, सचिव शीतल नाटेकर, क्षमा टोपले, पुनम गोवेकर, स्मिता गवंडळकर, मथुरा गोवेकर, दिव्या डांगी, रिया काटकर, मनीषा मराठे, शिल्पा नाटेकर, आदी मान्यवर उपस्थित होत्या.
सुरवातीला वैश्य गुरु प. पु. श्री वामनाश्रम स्वामीजीच्या फोटोला पुष्पहार घालून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने संमेलनाची सुरवात करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रज्ञा कुडतरकर यांनी सांगितले की आजच्या काळात महिलांनी मागे राहता कामा नये, आपल्या मनातीत इच्छेनुसार व्यवसाय करण्यासाठी पुढे आले पाहिजे. व्यवसाय करताना सचोटी ठेवली तर व्यवसायात यश निश्चित आपले असेल. व्यवसाय करताना मेहनत घेतली तर आपला व्यवसाय फायद्यात येईल. उद्योग व्यवसायासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत त्याचा फायदा घेऊन वैश्य समाजातील महिलांनी उद्योगिनी होण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.रुपाली गवंडळकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
स्वागत ऍड. सिद्धी पारोडकर यांनी केले.पाहुण्यांचा परिचय दिव्या डांगी यांनी करून दिला. सूत्रसंचालन शिल्पा नाटेकर व स्मिता गवंडळकर यांनी केले तर शीतल नाटेकर यांनी आभार मानले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा महिलांना व्यवसाय करताना अनेक संकटे येतात, पण उद्योगिनी महिलांनी संकटावर मात करण्याची क्षमता आपल्या मनगटात ठेवली पाहिजे

.
[ays_slider id=1]