पत्फर्मिंग आर्ट असोसिएशन ऑफ इंडिया आणि सम्राट क्लब पर्वरी यांच्या संयुक्त अखिल भारतीय गायन विजेतेपद

.

स्पर्धेअंतर्गत दक्षिण भारत विजतेपदासाठी गायन स्पर्धेची गोवा राज्यासाठी पहिली फेरीची 13 मार्च रोजी हॉटेल ओटीयमच्या सभागृहात पर्वरी येथे घेण्यात आली. लहान मुलांसाठी स्पर्धा तिन वेगवेगळया वयोगटात घेण्यात आली तर सुपर मॉम व सुपर डॅड ही पालकांसाठी स्पर्धा संपन्न झाली. या कार्यक्रमाला संगीत प्रेमी व रसिकांचा मोठया संख्यने प्रतिसाद मिळाला.
सविस्तर निकाल खालिलप्रमाणेः आठ वर्षाखालिल वयोगटात भारतीय चित्रपट संगीत विभागात प्रथम – सुदिक्षा द्विवेदी, द्वितीय – सावनी पै, पाश्चात्य विभागात प्रथम – सुदिक्षा द्विवेदी, द्वितीय – जॅमि मिरांडा,आठ ते चौदा वर्ष वयोटातील भारतीय चित्रपट संगीत विभागात पुरूष गटातून पांडूरंग उर्फ खुष पेडणेकर,महिला गटात जाफनी मिरांडा ,भाविका कुडाळकर, तर १४ ते १८ वयोगट पुरूष गटात तेजस वेर्णेकर तर महिला गटात सावनी सिनारी,पाश्चात्य विभागात, प्रथम -सावनी सिनारी, १८ ते २४ वयोगट भारतीय चित्रपट संगीत पुरूष विभागात प्रथम नवाब शेख, द्वितिय शुभम नाईक,तृतिय मनोज गांवकर, तर महिला विभागात प्रथम सुलोचना प्रभू, द्वितीय श्रुती के.तृतिय – रोहिणी करमळकर, २४ वर्षावरील वयोगटात भारतीय चित्रपट संगीत पुरूष विभागात प्रथम -प्रसाद नाईक द्वितीय – बिनय मेस्त्री तृतिय- राम चोडणकर, तर महिला गटात सेजल परब, सुपर मॉम भारतीय चित्रपट संगीत प्रथम स्वाती सिनारी, द्वितीय –संगीता नाईक, पाश्चात्य विभागात ऑडफ्रे वाझ, सुपर डॅड भारतीय चित्रपट संगीत विभागात प्रथम समिर वायंगणकर, द्वितीस महेश पाटणकर, तृतिय मंगेश कोटणीस, तर देशभक्तीपर समुहगीत गायनात महेश पाटणकर , व मंगेश कोटणीस यांना पारीतोषिक प्राप्त झाले. तर उत्कृष्ट सादरीकरणाचे पारीतोषिक मुकूल कौशिक यांनी पटकावले.
याफेरीत व झालेले स्पर्धक हरिद्वार येथे अखिल भारतीय स्तरावर होणा–या गायन विजेतेपद गोव्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी डान्स इंडिया डान्स चे नामवंत कलाकार कमलेश पटेल, सम्राट क्लब राज्य 1 चे अध्यक्ष श्री दिपक नार्वेकर, सचिव प्रविण सबनिस, खजिनदार गौतम खरंगटे, माजी अध्यक्ष डॉ. उदय कुडाळकर, कार्य्रक्रम अधिकारी सम्राट शुभदा डिचोलकर,सम्राट मनोज कारापुरकर, सम्राट क्लब पर्वरीच्या अध्यक्षा रश्मी हळदणकर, कार्यक्रम संयोजक अनुज हरमलकर, व इतर पदाधिकारी उपस्थीत होते.
परफॉर्मिंग आर्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव श्री सुदेश साळगांवकर यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले.यावेळी समुह नृत्य तसेच इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar