अविरत ज्ञानसाधना हीच यश प्राप्त करण्याची गुरुकिल्ली आहे असे उद्गार पीर्ण ग्राम सेवा मंडळाचे सचिव श्री प्रकाश नाईक यांनी काढले. श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय पीर्णतील बारावीच्या मुलांचा निरोप समारंभ विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्काराची शिदोरी देखील जीवनाच्या वाटचालीत अतिशय महत्त्वाची असते याची जाणीव करून दिली. यावेळी व्यासपीठावर श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य उमेश नाईक ,वाणिज्य शाखेचे वर्गशिक्षक प्रा. रजनीकांत सावंत, कला शाखेचे वर्गशिक्षक श्री दत्ता परब हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य उमेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना विद्यालयाची उज्वल निकाल परंपरा अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी अकरावीच्या विद्यार्थ्यांतर्फे कुमारी कुसुम पिंगे कुमारी अक्षता नाईक, गाडी नेत्रा लांबाडे, कुमारी रिचा मुरकर, समीक्षा वारकड कर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना बारावीच्या मुलांना शुभेच्छा दिल्या. कुमारी खुशी कळंगुटकर, कुमारी प्रियांक सावळ कुमार बाबली च्यारी कुमारी नेहा नाईक, कुमार सुदीप फडते या बारावीच्या मुलांनी दोन वर्षाच्या काळातील शाळेच्या संदर्भात त्यांना आलेले अनुभव कथन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकरावी वाणिज्य शाखेच्या कुमारी सुखी नाईक यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभ कुमारी मिताली तळणकर ,कुमारी श्रद्धा कोरगावकर ,कुमारी शांती नाईक,कुमारी उर्वशी वजरकर कुमारी साक्षी चांदेकर यांनी गायिलेल्या स्वागत गीताने करण्यात आला. कु.ओंकार फडते यांने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी विश्वास नाईक, यशवंत साखळकर यांनी विशेष परिश्रम
घेतले.
अविरत ज्ञानसाधना हीच यश प्राप्त करण्याची गुरुकिल्ली आहे असे उद्गार पीर्ण ग्राम सेवा मंडळाचे सचिव श्री प्रकाश नाईक यांनी काढले
.
[ays_slider id=1]