हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माशेल येथे विविध ठिकाणी आयोजित प्रवचनांच्या माध्यमातून गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व विशद

.

_*हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक*_

दिनांक : ३१.३.२०२२

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माशेल येथे विविध ठिकाणी आयोजित प्रवचनांच्या माध्यमातून गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व विशद
माशेल, ३१ मार्च – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देवालई, खांडोळा; कुंभारजुवे; आमयवाडा, खांडोळा आणि तिवरे या ठिकाणी आयोजित प्रवचनांमध्ये गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व विशद करण्यात आले.
या प्रवचनांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सोनाली सावंत यांनी गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व, गुढीपाडवा कसा साजरा करावा, गुढी उभारण्याची योग्य पद्धत यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. गुढीपाडव्याला हिंदु नववर्ष साजरा करण्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारण काय आहे ? आणि हिंदु धर्माची प्राचीनता याविषयी प्रबोधन करण्यासमवेतच उपस्थितांना या गुढीपाडव्यापासून नियमित धर्माचरण करण्यासाठी आवाहन करण्यात आले. सौ. सोनाली सावंत पुढे म्हणाल्या,‘‘लव्ह जिहाद’, धर्मांतर आदींना आज हिंदु महिला आणि एकंदरीत हिंदु समाज बळी पडत आहे. पाश्‍चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे आज हिंदूंना हिंदु धर्माविषयी स्वाभिमान राहिलेला नाही. यामुळे हिंदूंनी हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे महत्त्व समजून घेऊन त्यानुसार आचरण करणे अत्यावश्यक आहे. यामुळे प्रभावी असे हिंदूसंघटन होऊन पुढे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे.’’ या सर्व प्रवचनांचा १०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

*आपला विश्‍वासू,*
*डॉ. मनोज सोलंकी*,
*हिंदु जनजागृती समितीकरिता,*
*(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)*

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar