आपला हा इतिहास पराभवाचा नसून तर तो पराक्रमाचा इतिहास आहे आणि असा हा इतिहास आपण जागृत ठेवायला पाहिजे, त्याचे विस्मरण होता कामा नये

.

आपला हा इतिहास पराभवाचा नसून तर तो पराक्रमाचा इतिहास आहे आणि असा हा इतिहास आपण जागृत ठेवायला पाहिजे, त्याचे विस्मरण होता कामा नये. आज चुकीचा इतिहास शिकवला जात आहे असे प्रतिपादन योगेशजी सोमण यांनी म्हापसा येथे नववर्ष स्वागत समिती आयोजित सार्वजनिक गुढीपाडवा उत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
भारतीय इतिहासाची सोनेरी पाने ” या विषयावर बोलताना त्यांनी पुढे सांगितले की आपल्या इतिहास ला नख लावण्याचे काम ब्रिटिशांनी पदतशीर पणे केले. आपल्या देशाचे नाव इंडिया केले. येथे इगलीश शिक्षण पद्धत लावली. राम मंदिर वर बोलताना ते म्हणाले की राम मंदिर उभ राहण म्हणजे करोडो हिंदू लोकांच्या हदयात राम जागृत होणे होय.
भारत हा एक संघ राष्ट्र आहे ही चाणक्य यांची महत्त्व कांक्षा होती हे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे देऊन आपली पंरपरा कशी थोर आहे याचे स्पष्टीकरण दिले. आपल्या देशात चरक सारखे सुक्षूत सजन होऊन गेले एवढेच नव्हे तर चाणक्य सारखा विद्वान गुरू होऊन गेलाचे सांगितले.
तत्पूर्वी पहाटे शोभायात्रा काढण्यात आली, त्यात दिंडी पथक, लेझीम पथक, ढोल पथक, महीला पंचारती घेऊन पारंपरिक वेषात सहभागी झाल्या होत्या. टॅक्सी स्टैंड वर सार्वजनिक गुढी योगेशजी सोमण यांच्या हस्ते उभारण्यात आली
. तनीशा मावजेकर हीने सुंदर गीत सादर केले
यावेळी व्यासपीठावर यावेळी नववर्ष स्वागत समीती अध्यक्ष वैभव राऊळ ,कार्यवाह कौतुभ राऊत व नववर्ष समिती चे सदस्य उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय वरेरकर यांनी केले तर कौतुभ राऊत यांनी आभार मानले. संध्याकाळी माहिती व प्रसिद्ध खाते पुरस्कृत स्वर वंदन हा भावगीते, नाट्य गीत व देशभक्ती पर गीता चा कार्यक्रम संपन्न झाला. यात प्रसन्न तेंडुलकर, समृद्ध चोडणकर, तनीशा मावजेकर या गायक कलाकारांना भाग घेतला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar