आपल्या प्रभागातीलच नव्हे तर दुसऱ्या प्रभागातील विकासकामांना सुद्धा प्राधान्य दिले आहे असे प्रतिपादन शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी बंदिरवाडा, शापोरा येथे बोलताना केले

.

 

प्रभागातील विकासकामांचे पंचायतीत ठराव घेतले म्हणजे कामे होतात असे नाही, त्यांचा पाठपुरावा करणे महत्वाचे, कारण संबंधित खात्यात सादर केलेल्या फाईल्स रेंगाळत पडतात. त्यामुळे काही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी 4-5 वर्षे लागतात, संदेश खोर्जुवेकर याने ठरावांचा पाठपुरावा केल्यानेच त्याने आपल्या प्रभागातीलच नव्हे तर दुसऱ्या प्रभागातील विकासकामांना सुद्धा प्राधान्य दिले आहे असे प्रतिपादन शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी बंदिरवाडा, शापोरा येथे बोलताना केले.
हणजूण कायसूव पंचायतीचे पंचसदस्य संदेश खोर्जुवेकर यांच्या प्रभाग क्र.3 ( बंदिरवाडा ) मध्ये रस्ता काम दुरुस्ती, नाला बांधकाम, रस्ता बांधकाम, ग्रामीण विकास यंत्रनेमार्फत विकासकामे व सौर ऊर्जेवरील बसवण्यात आलेले दिवे अश्या पाच विकास्कामाचे उदघाट्न व पायाभरणी आमदार डिलायला लोबो यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की निवडणुकीच्या वेळी आपल्याला चांगले सहकारी व कार्यकर्ते मिळाले, त्यांच्या चांगल्या कामामुळेच व त्यांच्या जोरावर आपण विजयी झालो. मतदार संघातील पाण्याचा प्रश्न आपण नुकताच विधानसभेत आपण मांडला, त्याचा पाठपुरावा आपण करीत राहणार, व मतदारांची सर्व कामे पूर्ण करणार असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर, हणजूण कायसूवचे पंचसदस्य संदेश खोर्जुवेकर, असगावचे सरपंच हनुमंत नाईक, पंचसदस्य श्रीसागर नाईक, माजी जिल्हापंचायत सदस्य मनोज कोरगावकर, सांबाखा च्या रस्ते विभागाचे सहाय्य्क अभियंता जॉन, कनिष्ठ अभियंता संदीप, गोपाल, जलस्रोत खात्याचे कनिष्ठ अभियंता वेणू, साहिल, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकाश व समाजसेवक संकेत उपस्थित होते.
यावेळी संदेश खोर्जुवेकर, हनुमंत नाईक चंद्रकांत चोडणकर, मनोज कोरगावकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें