कोवीड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेतर्गत शिवोलीच्या आरोग्य केंद्रावर आयोजित विशेष कोवेक्सिन तसेच कोरगीवेक्स शिबीरास चांगल्यापैकी प्रतिसाद लाभल्याचे केद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गांवस यांनी सांगितले

.

 

कोवीड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेतर्गत शिवोलीच्या आरोग्य केंद्रावर आयोजित विशेष कोवेक्सिन तसेच कोरगीवेक्स शिबीरास चांगल्यापैकी प्रतिसाद लाभल्याचे केद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गांवस यांनी सांगितले. सध्या राज्यात कोवीड केसेस जरी कमी असल्या तरी भविष्यात कोवीडपासून कायमस्वरूपी संरक्षण मिळण्यासाठी पालकांनी आपल्या बारा ते चौदा तसेच पंधरा ते अठरा वयोगटातील मुलामुलींना या लसीकरण मोहीमेचा लाभ करून देण्याचे आवाहन यावेळी डॉ. गांवस यांनी केले.
शिवोली आरोग्य केंद्र क्षेत्रातील एकुण पाच हायस्कुल्समधून आतापर्यंत बारा वर्षावरील मुलांमुलींसाठी अशा प्रकारची लसीकरण मोहीम राबविण्यात आलेली असून या मोहिमेला पालक वर्गाकडून मुलांच्या परिक्षांचा काळ असल्याने संमिश्र प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे पुन्हां एकदां अशाचप्रकारची मोहीम हायस्कुलांतर्गत राबविण्याचा कार्यक्रम निश्चित असल्याचे केद्राच्या मुख्य अधिकारी डॉ. साधना शेट्ये यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
या विशेष लसीकरण शिबीराचा परिसरातील मुलां मुलींनी स्व्यंस्फुर्तीने लाभ करून घेतल्याचे डॉ. शेट्ये यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आरोग्य केद्रावर लसीकरण करून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या बारा वर्षावरील मुलांशी याबाबतीत बोलणी केली असतां कोवीड सारख्या महामारीवर मात करण्यासाठी लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आपल्याला आईवडिल तसेच शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले तसेच आजच्या लसीकरणानंतर मनातील कोवीडची भीती कायमची नष्ट झाल्याचे मुलांनी सांगितले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar