पणजी: गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि हळदोणचे आमदार कार्लूस फेरेरा यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यासाठी सभापतीच्या कार्यालयाला पत्रे सादर केली.
यावेळी आमदार मायकल लोबो,हळदोणचे आमदार कार्लुस फेरेरा फरेरा
साळगावचे आमदार केदार नाईक, कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव, जीपीसीसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख आणि जीपीसीसीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अमित पाटकर यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते आणि मुख्य व्हीपच्या निवडीबाबत निर्णय घेण्यात आला.
“29 मार्च 2022 रोजी विरोधी पक्षनेत्यांच्या चेंबरमध्ये सभासदांची बैठक घेतली आणि घेतलेले निर्णय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना कळविण्यात आले. मायकल लोबो यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्तीला मान्यता देण्यात आली.” असे पत्रात म्हटले आहे.
“त्यांच्या नियुक्त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मान्यता दिली आहे.” असे पाटकर म्हणाले.
अमित पाटकर यांनी मायकेल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि आमदार कार्लुस फेरेरा फरेरा यांची मुख्य प्रातोद म्हणून नियुक्ती करण्याची विनंती सभापतींना केली आहे.
पत्रकारांशी बोलताना अमित पाटकर म्हणाले की, काँग्रेस लोकांचा आवाज बनून राहील आणि लोबो यांच्यासह इतर आमदार विधानसभेत प्रश्न मांडतील.
“तीन रेषीय प्रकल्प असोत, किंवा पर्यावरणाचा नाश होण्यास वाव देणारे आणखी कुठलेही प्रकल्प असो, आम्ही हे मुद्दे गोव्याच्या भल्यासाठी मांडू.” असे पाटकर म्हणाले.