दिनांक : ०४.०३.२०२२
_वेर्ला, बार्देश येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा_
गोमंतकियांवर ‘इन्क्विझिशन’द्वारे केलेल्या अनन्वित अत्याचारांविषयी पोप फ्रान्सिस क्षमा कधी मागणार आहेत ? – श्री. गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती
म्हापसा, ४ एप्रिल – पोप फ्रान्सिस यांनी कॅनडातील कॅथॉलिक चर्चकडून चालवण्यात आलेल्या विद्यालयाच्या वसतीगृहामध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविषयी कॅनडातील मूलनिवासी लोकांची नुकतीच क्षमा मागितली आहे. गोव्यात पोर्तुगीज राजवटीत चर्च संस्थेने तब्बल २२५ वर्षे ‘इन्क्विझिशन’च्या नावे गोमंतकियांवर अनन्वित अत्याचार केले. या प्रकरणी पोप फ्रान्सिस गोमंतकियांची क्षमा कधी मागणार आहेत ?, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी उपस्थित केला आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कलांगण सभागृह, सातेरी नगर, वेर्ला, बार्देश येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत श्री. गोविंद चोडणकर बोलत होते.
श्री. गोविंद चोडणकर पुढे म्हणाले,‘‘म्हापसा परिसरातील धर्मांतरित झालेले एक प्रतिष्ठित हिंदु डॉक्टर अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानामुळे त्यांचा रोग बरा झाल्याचे सांगत आहेत. असे असेल, तर हे धर्मांतरित डॉक्टर रुग्णांना बरे करण्यासाठी दवाखाना का चालवत आहेत ? हिंदुस्थानात हिंदु बहुसंख्य असूनही त्यांना अनन्वित अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी प्रत्येक हिंदूने धर्माचरण करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपले योगदान देणे आवश्यक आहे.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नेहा गोवेकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. शेखर आगरवाडेकर यांनी केले.- हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे खास आकर्षण म्हणजे सभेच्या ठिकाणी फ्रँच पत्रकार श्री. फ्रांसुआ गोतिये यांनी सिद्ध केलेले वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्याकांडाचे सचित्र प्रदर्शन लावण्यात आले होते.
आपला विश्वासू,
डॉ. मनोज सोलंकी,
हिंदु जनजागृती समिती,
संपर्क क्रमांक – ९३२६१०३२७८