हणजूण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत हिंगाता यासुजी (59) या जपानी नागरिकास अटक करून सुमारे 3 लाख 20 हजारांचा अंमली पदार्थ जप्त केला

.

 

मिळालेल्या माहिती नुसार दि.7 रोजी पहाटे 0.30 ते 3.30 या वेळेत ही कारवाई करण्यात आली. झोरवाडा हणजूण येथे ला विवोला व्हिला जवळ भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका विदेशीकडे अंमली पदार्थ असल्याची खबर मिळाल्यानंतर हणजूण पोलीस स्थानकाचा तात्पुरता ताबा सांभाळणाऱ्या सहाय्यक पोलीस अधीक्षक स्वाती सिंग यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक स्नेहा सावळ, उपनिरीक्षक फ्रान्सिको झेविअर, पोलीस शिपाई गोदीश गोलतेकर, महेंद्र मांद्रेकर, शंभा शेटगावकर, आदर्श नागवेकर, सुदेश कारेकर या पोलीस पथकाने तेथे धाड टाकली.
यावेळी त्याने घराच्या बाहेर पार्क केलेल्या GA 03 AE 5494 या ऍक्टिवा स्कुटरच्या डिकीत एक किलो वजनाचा व रु. एक लाख किंमतीचा चरस आणी 133 ग्राम वजनाचा व 20 हजार रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ सापडला.हणजूण पोलिसांनी हिंगाता यासुजी याच्या विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद करून अटक केली. ऍक्टिवा स्कुटर, मोबाईल फोन व वैधता समाप्त झालेला त्याचा पासपोर्ट जप्त केला असून त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची कोठडी देण्यात आली.
हणजूण पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक स्नेहा सावळ या उपअधीक्षक उदय परब आणी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar