नाट्य प्रशिक्षण हे नाटय़ कलाकार घडविण्यापुरते मर्यादित नसते तर त्यायोगे चारित्र्य, सुसंस्कृतपणा, सभाधीटपणा, आत्मविश्वास, नेतृत्व गुण वाढीस लागत असतात असे उदगार माजी मुख्यमंत्री तथा हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हरमल येथे काढले

.

ग्रामवर्धिनी हरमल व कला व संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नाटय़ शिबीरात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हरमल ज्ञानदा सभागृहात आयोजित नाटयशिबीराचा उदघाटन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यकारी अध्यक्ष देवानंद कुडव, संस्थेचे सरचिटणीस अर्जुन गडेकर , विधाप्रसारक हायस्कूल चे मुख्याध्यापक दिलीप मेंथर, नाटय़ प्रशिक्षक ज्ञानेश्वर पासैकर, तारा केरकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी देवानंद कुडव व ज्ञानेश्वर पासै वाताहार यांची भाषणे झाली. गुरुदास नानोसकर , संदीप गावडे, संदीप वायंगणकर यांनी पुष्प गुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन गडेकर यांनी केले तर. संदीप गावडे यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar