भारतात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांमध्ये स्थनकर्करोगाचे प्रमाण जास्त दिसून येते. वाढत्या वयाबरोबर महिलांनी वेळच्यावेळी स्थनरोगाविषयी चिकित्सा करून घेतली तर अनेक महिला या रोगापासून मुक्त होऊ शकतात व आपले उर्वरित आयुष्य आनंदाने जगू शकतात.हा आनंद प्रत्येक महिलांपर्यत पोहचवण्यासाठी क्रिकेटीयर युवराज सिंग यांनी एक ट्रस्ट स्थापन करून योग्य तज्ञाकडून गावोगावी मोफत स्थनकर्करोग निदान शिबीरे आयोजित करून या रोगावर नियंत्रण आणण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.
अश्याच प्रकारचे शिबीर काणका येथील सातेरीनगर कॉलनीत आयोजित करण्यात आले होते. यात 48 महिलांनी आपली तपासणी करून घेतली. डॉ. श्रुती गावकर व डॉ. साची प्रभू म्हांबरे यांनी ही चाचणी केली व महिलांना योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शीतल नाटेकर व सिमा कोरगावकर यांनी सहकार्य केले.