_*हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक*_
दिनांक : 11.4.2022
_देशातील धार्मिक सलोखा बिघडवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !_
*रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज !*- हिंदु जनजागृती समिती
काल देशभरात उत्साहात पार पडलेल्या श्रीरामनवमीच्या दिनी अनेक राज्यांत रामनवमीच्या मिरवणुकांवर दगडफेक करत भीषण आक्रमण करण्याचे प्रकार घडले. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, बंगाल आदी अनेक राज्यांत धर्मांध मुसलमानांकडून हे आक्रमण करण्यात आले. एकीकडे देशात तणाव आणि सांप्रदायिकता वाढत असल्याचे कारण सांगून हिंदु संत-धर्माचार्य यांच्यावर कारवाईची मागणी कम्युनिस्ट, सेक्युलरवादी, पुरोगामी सतत करत असतात; मात्र हिंदूंच्या सणांच्या वेळी धर्मांधांकडून झालेल्या आक्रमणांविषयी ही मंडळी सोयीस्करपणे मौन बाळगतात. मूर्तीभंजक मोगलांचा इतिहास हा सर्वश्रृतच आहे. भारतातील लाखो मंदिरांवर मोगलांनी आक्रमण करून ती नष्ट आणि भ्रष्ट केली, तसेच हजारो मंदिरांवर आक्रमण करून त्याठिकाणी मशिदी बांधल्या आहेत. नुकतेच श्रीरामजन्मभूमी प्रकरण सर्वाेच्च न्यायालयाने निकाली काढून श्रीराम मंदिराची पायाभरणी चालू असतांना काही धर्मांधांना रामनवमी निमित्त काढण्यात येणार्या मिरवणुकांवर देशभरात आक्रमणे केली. हा प्रकार अत्यंत गंभीर असून केंद्र सरकारने याप्रकरणी तत्काळ दखल घ्यायला हवी. हिंदूंच्या संयमाचा अंत कोणी पाहू नये. रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज असून या प्रकरणी या प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
देशभरात हिंदूंच्या सणांच्या वेळी घडणारे हे प्रकार संतापजनक आहेत, तरी कोणत्याही मेनस्ट्रीम मीडीयामध्ये या घटनांबद्दल विशेष चर्चा होतांना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात राजस्थानमधील करौली येथे गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेल्या हिंदू नववर्षयात्रेवर धर्मांधांनी भीषण हल्ला केला. तेथील अनेक हिंदू दुकानदार स्वत:चे दुकान विकून जाण्याच्या सिद्धतेत आहेत. म्हणजे वर्ष 1990 मध्ये काश्मीरमध्ये हिंदूंसोबत जे घडले, ते भारतात अन्यत्रही घडू लागले आहे. यापूर्वीही नवरात्री आणि अन्य सणांच्या वेळीही अशीच आक्रमणे सातत्याने झालेली आहेत.
‘जेएनयू’मध्ये तर राक्षस असलेल्या महिषासुराची जयंती साजरी करण्यापासून ‘भारत तेरे तुकडे होंगे ।’ या घोषणा दिलेल्या चालतात; मात्र ‘जय श्रीराम’ची घोषणा आणि रामनवमीची पूजा केलेली चालत नाही. जेएनयूमध्येही काल हिंसक घटना घडली. देशभरात घडणार्या घटना पहाता हे एक सुनियोजित षड्यंत्र आहे, असेच लक्षात येते. तरी आम्ही मा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांच्याकडे या घटनांची सखोल चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे.
आपले नम्र,
*श्री. रमेश शिंदे,*
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क क्र.: 99879 66666)