हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ठिकठिकाणी सामूहिक गार्‍हाणे

.

_*हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक*_

दिनांक : ११.४.२०२२

हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ठिकठिकाणी सामूहिक गार्‍हाणे
पणजी, ११ एप्रिल – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण भारतवर्षामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून श्रीरामनवमीच्या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापना आणि विश्‍वकल्याण यांसाठी ठिकठिकाणी सामूहिक गार्‍हाणे घालण्याचा उपक्रम करण्यात आला.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान (परात्पर गुुरु) डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात हिंदु राष्ट्र-जागृती अभियान चालू करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीरामनवमीला गोव्यात ८ ठिकाणी सामूहिक गार्‍हाणे घालण्याचा उपक्रम राबवण्यात आला. श्रीराम मंदिर, पोर्बुंफा; श्री अनंत देवस्थान, सावईवेेरे; श्री साईनाथ मंदिर, हळदोणा; पैंगीण, काणकोण येथील श्री परशुराम मंदिर; लोलये, काणकोण येथील श्री दामोदर देवस्थान; मराठवाडा, मांद्रे, पेडणे येथील सद्गुरु श्री सिद्धारूढ स्वामी मठ; भाटले, पणजी येथील श्री राम मंदिर आणि तीन माड, कुचेली येथील श्री रामदास स्वामी मठ येथे हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात स्थानिक हिंदुत्वनिष्ठ, मंदिराचे पुजारी आणि जिज्ञासू यांनी सहभाग घेतला.

*आपला विश्‍वासू,*
*डॉ. मनोज सोलंकी,*
*हिंदु जनजागृती समिती,*
*संपर्क क्रमांक – ९३२६१०३२७८*

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar