दिनांक १६ रोजी सकाळी ९ वाजता यजमान श्री व सौ. अंजली अजय वेगुलेंकर व श्री व सौ. पार्वती शंकर कोरगांवकर यांच्या यजमानपदाखाली स्वामी समर्थ मठात गणपती पूजन, श्री चा महा अभिषेक, स्वामी नाममंत्रहवन व नंतर दुपारी महाप्रसाद व संध्याकाळी ३ वाजता नागगावडा भजन मंडळ भालखाजन कोरगांव यांच्या तफै भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर दुपारी लक्षीता सिद्धार्थ कोरगांवकर यांच्या तफै गायनाचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी ५ वा हनुमान चालीसा पठन होईल. तदनंतर ६.३० वाजता शिवोली येथील श्री स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने आरतीचा कार्यक्रम होईल. रात्रौ ८ वा जोडवी पेटवून दिवजोसव साजरा होणार आहे व महाप्रसादाने वधापनदिन सोहळ्याची सांगता होणार आहे.