_पाजीफोंड, मडगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा_

.

*हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक*

दिनांक : १०.४.२०२२

प्रति,
संपादक महोदय/प्रमुख प्रतिनिधी

_पाजीफोंड, मडगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा_

*हिंदूंनो, धर्म जाणा, धर्म जगा, हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा ! – श्री. सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती*

मडगाव, १० एप्रिल – हिंदूंनो, धर्म जाणा, धर्म जगा *आणि* हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री वीरशैव लिंगायत मठ येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत श्री. सत्यविजय नाईक बोलत होते.
ते पुढे म्हणाले,‘‘आपल्याला ‘हिंदु राष्ट्र कोणी बाहेरून येईल आणि स्थापन *करून* देईल, असे होणार नाही. ईश्‍वरी कृपा, संताचे आशीर्वाद आणि हिंदूसंघटन अर्थात आपल्या कर्तव्य कर्मातून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी स्वत:च्या स्तरावरही प्रयत्न करावे लागणार आहेत. आज ‘मेकॉले’ शिक्षणपद्धतीने आपण शिक्षित बनत आहोत; परंतु धर्मापासून दूर जात आहोत. आजच्या भाषेत सांगायचे तर, आमच्या मनात ‘सॉफ्टवेअर’मध्ये पाश्‍चात्य विकृतीचा ‘व्हायरस इन्स्टॉल’ केला आहे. आपण आपली वेशभूषा, केशभूषा, आहार, संस्कृती आणि परंपरा सर्व विसरत चाललो आहोत. धर्मपालन करणे हे आपल्यास हास्यास्पद आणि कमीपणाचे वाटत आहे; पण आपली संस्कृती सोडल्याचा परिणाम आज प्रत्येक घरात दिसत आहेत. हिंदूंनी हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करून त्याचे आचरण करायला पाहिजे.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गीता कवळेकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन सौ. आर्या गावकर यांनी केले. सभेनंतर उपस्थित जिज्ञासूंनी पाजीफोंड भागात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

*आपला विश्‍वासू,*
*डॉ. मनोज सोलंकी,*
*हिंदु जनजागृती समिती, संपर्क क्रमांक – ९३२६१०३२७८*

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar