भारत देशातून क्षयरोगाचे साल 2025 पासून समुळ उच्चाटन करण्याचा सरकारचा संकल्प आहे त्यासाठी राज्यातील प्रत्येक आरोग्य केद्राच्या माध्यमांतून स्थानिक लोकांमध्ये क्षयरोगां संबंधात जन-जाग्रुती केली जात आहे

.

 

भारत देशातून क्षयरोगाचे साल 2025 पासून समुळ उच्चाटन करण्याचा सरकारचा संकल्प आहे त्यासाठी राज्यातील प्रत्येक आरोग्य केद्राच्या माध्यमांतून स्थानिक लोकांमध्ये क्षयरोगां संबंधात जन-जाग्रुती केली जात आहे. कुठल्याही परिस्थितीत येत्या वर्ष 2025 पर्यत आपल्याला देशातून क्षयरोगांचे नामोनिशाण मिटवायचे आहे त्यांसाठी स्थानिक लोकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत या जनजागृती मोहिमेच्या प्रमुख पर्यवेक्षक रेश्मा परब यांनी शिवोलीत व्यक्त केले.
येथील थियेटर जंक्शन ते तारची-भाट येथील मासळी मार्केट परिसरात स्थानिक आरोग्य केद्रातर्फे क्षयरोग निर्मुलन संबंधात जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोहिमेच्या रेशमा परब या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. दरम्यान, 24 मार्च ते 13 एप्रिल पर्यत जागतिक क्षयरोग निर्मुलन पंधरवडा जगभरात साजरा केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील आरोग्य केद्रावर विविध कार्यक्रम तसेच उपक्रमाच्या वतीने क्षयरोगांसंबंधात जनजागृती करण्यात येत असते तसेच केद्राच्या कर्मचार्यांतर्फे घरोनघरी जाऊन क्षयरोगा संबंधात स्थानिक लोकांना माहीत करून दिली जात असल्याने परब यांनी यावेळी सांगितले. यावेळी आरोग्य केद्राच्या वतीने काढण्यात आलेल्या क्षयरोग जनजागृती फेरीत शिवोली आरोग्य केद्राच्या डॉ. श्रुती नार्वेकर तसेच अन्य सहकारी अधिकारी उपस्थित होते.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar