म्हापसा पालिका क्षेत्रातील प्रभागांतील विविध विकासकामे हाती घेण्यासाठी म्हापसा नगरपालिकेस राज्य सरकारकडून 2.60 कोटी रुपये निधी वितरित केला आहे

.

म्हापसा पालिका क्षेत्रातील प्रभागांतील विविध विकासकामे हाती घेण्यासाठी म्हापसा नगरपालिकेस राज्य सरकारकडून 2.60 कोटी रुपये निधी वितरित केला आहे.दोन टप्प्यात वितरित केलेला हा निधी, जो विशिष्ट कामांसाठी खर्च करुन वर्षभराच्या कालावधीत ही कामे पूर्ण झाली पाहिजेत. या निधीअंर्तगत रस्त्यांचे डांबरीकरणापासून गटारे बांधणे, पेव्हर्स बसविणे आदी कामांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात नगर विकास खात्याने 1.55 कोटी रुपये निधी जो 11 प्रभागांमधील चार विकास कामांसाठी वापरला जाईल.यामध्ये प्रभाग 16 मध्ये रस्त्याचे रीसर्फेसिंग करणे व गटार बांधकाम, प्रभाग 5 मध्ये पेव्हर्स बसविणे, प्रभाग 6 मध्ये फूटपाथ बांधून पेव्हर्सचे काम मिळून 35.56 लाख रुपये खर्च आहे. तर, उसपकर जंक्शनवरील रस्त्याचे रीसर्फेसिंग, तसेच क्रॉस ड्रेनसह वादळ पाण्याच्या निचर्‍याचे बांधकाम व खोर्लीमधील प्रभाग 18 मधील विद्यमान निचर्‍याचे पुर्नंबांधकाम आणि प्रभाग 19 मध्ये पेव्हर्सची सुविधा, तसेच प्रभाग 20 मध्ये टाइल्स बसविण्यासोबत निचर्‍याचे बांधकाम मिळून 42.69 लाख रुपयांचे काम केले जाणार आहे.
त्याचप्रमाणे, क्रॉस ड्रेनसह निचर्‍याचे बांधकाम, तसचे प्रिती अर्पाटमेंटजवळील विद्यमान रस्त्याचे रीसर्फेसिंग व प्रभाग 7 मध्ये पेव्हर्सचे बांधकाम, प्रभाग 8 मधील आकय झरीच्या आसपास गटाराचे बांधकाम, प्रभाग 9 मधील मोपकर फार्मसी ते रेमान्सो हॉस्पिटलच्या दोन्ही बाजूने गटारांची पुनर्बांधणी, तर प्रभाग 10 मधील विद्यमान गटारांची पुनर्बांधणी करणे मिळून 30.27 लाख रुपयांची कामे आहेत. तर प्रभाग 19 मधील म्हापसा मार्केटमध्ये पावसाच्या पाण्याचा निचर्‍याचे पुनर्बांधकामसाठी 38.07 लाख रुपयांचे कामही हाती घेतले जाईल.
तर दुसर्‍या टप्प्यात सरकारकडून दोन विकामकामांसाठी 1.05 कोटीचा निधी वितरित केला आहे. याअंतर्गत प्रभाग 1 मध्ये फूटपाथ व रस्त्यांमध्ये सुधारणा करणे, कल्वर्टचे बांधकाम व पेव्हर्स बसविणे, तसेच प्रभाग 2 मध्ये क्रॉस ड्रेनसह गटारचे बांधकाम, पेव्हर्ससह रस्त्यांची पुनर्बांधणी, प्रभाग 3 मधील रुझाईवाडो येथे नवीन रस्ता बांधणे व विद्यमान रस्त्याचे रीसर्फेसिंग करणे मिळून 53.04 लाखांचे काम असेल.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar