म्हापसा शहरासाठी उभारण्यात आलेला सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट कार्यन्वयित झाल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीत आढळल्याने सुरवातीला पहिल्या टप्प्यात प्रभाग क्र.7,8,19, व 20 या नजीकच्या प्रभागातील घरांना भूगटार वाहिनीशी जोडण्यात येईल, त्यानंतर कोणताही अडथळा न आल्यास उर्वरित सर्व प्रभागातील घरांना जोडण्यात येईल.अंडरग्राऊंड केबलींग म्हणजे भूमिगत विजवाहिनी घालण्याच्या कामालाही पुन्हा गती देण्यात आली असून करोना महामारी व निवडणुका यामुळे काम रेंगाळले होते, दोन वर्षाचा कार्यकाळापैकी फक्त पाच महिनेच काम झाले होते, उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याचे कंत्राटदाराला सांगण्यात आले आहे.
म्हापसा बाजारपेठ व इतर ठिकाणची सार्वजनिक सौचालयांची दुरुस्ती करण्याचा तसेच चणेकर लाईनचा पुढचा भाग, उसापकर लाईन, पानकर लाईन व युनियन फार्मसी ते जुने अझीलो रुग्णालया पर्यत पे पार्किंग करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी सांगितले.