पर्वरी वेताळ महारुद्र संस्थानात हनुमान जन्मोत्सव, वर्धापनदिन महोत्सव

.

पर्वरी येथील श्री वेताळ महारुद्र संस्थानातील श्री हनुमान जन्मोत्सव आणि श्री वेताळ मूर्ती प्रतिष्ठापनेचा ३३ वा वर्धापन दिन महोत्सव शनिवार दि. १६ एप्रिल पासून सुरू होणार आहे.
यानिमित्त १६ रोजी सकाळी ६.०० वा. श्री. व सौ. सुरेखा सुरेंद्र अस्नोडकर यांच्या यजमानपदाखाली श्री हनुमान जन्म सोहळा होणार आहे. तद्नंतर श्री गणेश पूजा, देवता प्रार्थना, पुण्याहवाचन, लघुरुद्र, पंचमुखी हनुमान कवच आवृती आरती, तीर्थ प्रसाद व महानैवेद्य होईल. संध्या ७.०० वा. श्रींची पालखी बॅन्ड वादनांसह मंदिराच्या प्राकारात मिरवणूक, तद्नंतर पावणी, आरती व तीर्थप्रसाद, नंतर रायकर बंधुतर्फे ‘सती आली श्रीराम भेटी’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
रविवार दि. १७ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता आराडी वाड्यातर्फे ‘आत्या आत्या सून कर’ हा कोकणी नाट्यप्रयोग होईल.
सोमवार दि. १८ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता श्री. विनायक गोपाळ अस्नोडकर यांच्यातर्फे ‘तुजे विणें रीतें जीणें’ नाट्यप्रयोग होईल.
मंगळवार दि. १९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता भुतकीवाड्यातर्फे ‘कोंढाण्याचा सिंह’ हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे.
बुधवार दि. २० एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता लिमावाड्यातर्फे ‘मायेची सावली’ हा नाट्यप्रयोग होईल.
गुरुवार दि. २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता बाजार व कासकरवाड्यातर्फे ‘आगळें तू वेगळे हांव’ हा कोकणी नाट्यप्रयोग होईल.
शुक्रवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी संस्थानमधील मूळस्थान भाटात पूजा, विष्णू , जप हवन होईल. पूजेचे यजमान श्री. व सौ. अम्रिता राजू हळदणकर हे आहेत. संध्याकाळी ७.३० वाजता सातगणनगर वाड्यातर्फे ‘पती सगळे ‘ नाट्यप्रयोग होईल.
शनिवार दि. २३ एप्रिल रोजी कृ. सप्तमी शके १९४४ रोजी संस्थानचा ३३ वा वर्धापन दिन महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त पुण्याहवाचन नवग्रह, रूद्रपीठपूजन, लघुरुद्र स्वाहाकार, क्षेत्रपाल पूजन, आरती, तीर्थप्रसाद व नंतर अन्न संतर्पण, महानैवैद्य होईल. संध्याकाळी ६.३० वाजता सुवासिनींच्या हस्ते श्रीस दिवजांची आरती, नंतर बॅन्ड वादनासमवेत श्रींची पालखीतून मिरवणूक, पावणी, आरती व तीर्थप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. वर्धापन दिनाचे यजमान श्री. व सौ. वासंती विनायक अरनोडकर, श्री. व सौ. रशिका सुरेंद्र गांवकर, श्री. व सौ. कविता कमलाकांत वळवईकर, श्री. व सौ. उत्कर्मा सुरज शेटगांवकर, श्री. व सौ. प्राजक्ता प्रदिप नाईक, श्री. व सौ. प्रसिला प्रसन्न नाईक, श्री. व सौ. गौरी सचिन वळवईकर, श्री. व सौ. निता सुरेश गडेकर हे आहेत. सर्व भक्तगणांनी वरील कार्यक्रमास उपस्थित राहून श्री कृपेस पात्र व्हावे, असे आवाहन श्री वेताळ प्रासदिक ट्रस्ट, पर्वरीतर्फे करण्यात आले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar