आचार्य अत्रे लिखित मोरूची मावशी या नाटकाचा शंभरावा प्रयोग परा॑ म्हापसा येथे पार पडला. यावेळी मोरूची मावशी फेम मावशी च्या भूमिकेतील भरत जाधव यांचा विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना भरत जाधव यांनी सांगितले की हा नाट्य प्रयोग विजय चव्हाण यांना समर्पित असून विजय सारखी आपणाला भुमिका जमली नसली तरी त्याची आठवण करून देण्याचा हा प्रयत्न आहे. यावेळी ॲड
दिपक तिळवे यांनी प्रास्ताविक केले. व त्यांनीच आभार मानले. एकंदर या नाटकाला उंदड प्रतिसाद लाभला. भरत जाधव यांनी प्रेक्षकांना प्रत्येक प्रसंगाला हसवून ठेवले होते.
. फोटो भारत बेतकेकर. भरत जाधव यांचा गौरव करताना विरोधी पक्षनेते मायकल लोबो, बाजुला दिपक तिळवे