मधलामाज मांद्रे येथील श्री मारुतीराय बलभीम देवतांच्या प्रांगणात स्व शांताराम व स्व रमाबाई कलशांवकर स्मरणार्थ रंगमंचाच्या अनावरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे नात्याने बोलत होते.फोंडा येथील नियोजित कार्यक्रम थोड्या उशिराने सुरू झाल्याने इथे येण्यास विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी आहे,मात्र पुन्हा असे होणार नाही,असे आमदार आरोलकर यांनी व्यक्त केले.ह्या देवस्थानच्या पूर्णतेसाठी रंगनाथ कलशांवकर व कुटुंबियाने अथक परिश्रमाने रंगमंच पूर्ण केला व आपल्या आई वडिलांच्या नांवे समर्पित केला हे आनंददायी आहे,त्याबद्दल कलशांवकर कुटुंबियांचे अभिनंदन आहे.मांद्रेतील जनतेने पूर्ण विश्वासाने निवडून दिल्याने आपणांची जबाबदारी वाढली आहे व त्याची पूर्ण जाणीव आहे.वीज,पाणी समस्या दूर होण्याची शक्यता बळावली असून राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी मांद्रेचे वीज सब स्टेशन व तुये येथील पाणी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. प्रत्येक पंचायत क्षेत्र व वाड्यावरील समस्यांची जाणीव असून आपण प्रत्यक्ष भेटी देणार असून नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन केले.देवस्थानचे अपूर्ण काम आगामी काळात पुढे पूर्ण होऊ दे असे आमदार जित आरोलकर यानी व्यक्त केले.
खास निमंत्रित मुंबई पोलिस निरीक्षक अधिकारी संभाजी जाधव यांनी देवस्थान समितीचे अभिनंदन केले व रंगनाथ कलशांवकर कुटुंबिय चांगल्यापैकी नाट्यकलाकर असून रंगदेवतेची सेवा ही अमूल्य असून ही संस्कृती पुढे अशीच चालू राहावी असे जाधव यांनी व्यक्त केले.रंगनाथ कलशांवकर व कुटुंबीयांनी देवस्थानसाठी रंगमंच आपल्या आई वडिलांच्या नांवे समर्पित केला ह्यासारखे मोठे भाग्य नाही.आपणांस हा बहुमान दिल्याबद्दल धन्यवाद असल्याचे मुंबई पोलिस अधिकारी जाधव यांनी व्यक्त केले.यावेळी पंच सुभाष आसोलकर यांनी कलशांवकर कुटुंबाचे देवस्थानच्या उभारणीत मोठा वाटा होता व आहे.ह्या देवस्थानच्या उत्सवात स्व शांताराम यांनी नेहमीच व्यवस्थापन नात्याने योगदान दिले व ती परंपरा त्यांचे पुत्र रंगनाथ व त्याहीपुढे सदानंद शांताराम कलशांवकर यांनी पुढे न्यावी असे पंचसदस्य सुभाष आसोलकर यांनी व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर मुंबईचे उद्योजक दिनेश पाटील,इंजिनियर शिवराज आसोलकर,कलशांवकर कुटुंबातील रक्षा रंगनाथ कलशांवकर, स्नेहा सदानंद कलशांवकर, सेजल,शांताराम, संजय नागवेकर आदी उपस्थित होते.प्रारंभी आमदार जित आरोलकर यांनी दीपप्रज्वलन व रंगमंच नामफलकाचे अनावरण केले.प्रास्ताविक व स्वागत उदेश पेडणेकर, पुष्पगुच्छ सेजल व शांताराम यांनी प्रदान केले तर सुत्रनिवेदन व आभार परेश नाईक यांनी केले.