साळीगाव : पिलेर्णे मार्रा ग्रामपंचायतीसाठी मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (MRF) ची पायाभरणी साळीगावचे आमदार केदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमाला आमदार शिवाय पिलेर्णेचे सरपंच संदीप बांदोडकर पंच सदस्य करण गोवेकरपंच सदस्य अमरनाथ गोवेकर, सचिव पीटर मार्टीन्स व सर्व पंच सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना साळीगावचे आमदार केदार नाईक म्हणाले की, पिलेर्णे पंचायत ही एक अशी पंचायत आहे जिथे सर्व पंच सदस्य एकजुटीने राहून विकासकामे करण्यात नेहमीच अग्रेसर असतात व त्याहून एक पाऊल पुढे असतात आणि सर्व पंचायतींना कसे ते दाखवून दिले आहे.
विकासकामे करून एकजूट आहोत, असे नाईक म्हणाले