राज्याच्या कला व संस्कृती खात्याच्या स्टेट लायब्ररी तर्फे चालविण्यात येणाऱ्या फिरत्या (मोबाईल लायब्ररी व्हॅन) ग्रंथालयाने नुकतीच हरमलच्या गणपत पार्सेकर महाविद्यलयाला भेट दिली.

.

राज्याच्या कला व संस्कृती खात्याच्या स्टेट लायब्ररी तर्फे चालविण्यात येणाऱ्या फिरत्या (मोबाईल लायब्ररी व्हॅन) ग्रंथालयाने नुकतीच हरमलच्या गणपत पार्सेकर महाविद्यलयाला भेट दिली.

ह्या मोबाईल व्हॅनतर्फे वाचकांना त्यांच्या दारी जाऊन पुस्तकं  वाचण्याची संधी दिली जाते.गणपत पार्सेकर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने संपर्क साधून विध्यार्थ्यांना लाभ देण्याचा विचार केला.एका हजारापेक्षा जास्त पुस्तकाचा खजिना विध्यार्थ्यांना उपलब्ध केला होता.हरमल पंचक्रोशी हायर सेकंडरीच्या विध्यार्थ्यांनी ह्या मोबाईल व्हॅनचा लाभ घेतला.यावेळी संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर, हायस्कुलच्या मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर, कॉलेजचे प्राचार्य उदेश नाटेकर ,ग्रंथपाल प्रमोद केरकर उपस्थित होते.स्टेट लायब्ररी विभागाचे कौतुक असून घरदारी पुस्तक व वाचनाचा लाभ देण्याऱ्या स्तुत्य उपक्रमाचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कौतुक केले.विध्यार्थ्यांच्या बरोबरीने अध्यपक मंडळींनी सुद्धा ह्या सेवेचा लाभ घेतला.यावेळी स्टेट लायब्ररी विभागाचे कर्मचारी वर्गाचे ,पार्सेकर महाविद्यालयाच्या अध्यापक मंडळींनी अभिनंदन केले.शेवटी पार्सेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रमोद केरकर यांनी आभार मानले.या ग्रंथालयाचा 261 विध्यार्थ्यांनी लाभ घेतला.

फोटो
हरमल—पार्सेकर महाविद्यालयात स्टेट लायब्ररीची मोबाईल व्हॅन विभागाच्या कर्मचाऱ्यासोबत चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर, स्मिता पार्सेकर, प्रमोद केरकर व अन्य

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar