विधाभारती गोवा यांनी पिपल्स हायस्कूल कामुली॑ व श्री शांता विधालय सडये शिवोली यांच्या सहकार्याने श्री सरस्वती विद्यामंदिर वागाळी कामुली॑ तसेच सरकारी प्राथमिक विधालय करासवाडा येथे २२ एप्रिल ते २८ एप्रिल व २३ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत जाणीव जागृती बाल शिबीराचे आयोजन केले आहे. वैचारिक सामर्थ्य तसेच आत्मबल वाढवणारी तसेच विधाथामधे विविध कौशल्ये विकसित करणारी विशेष सत्रे या शिबीरात घेण्यात येणार आहेत. रोज सकाळी ८.३० ते ११.१५ यावेळेत नियोजित सत्रे होतील अशी माहिती गोवा विधाभारती अध्यक्ष डॉ. सिताराम कोरगांवकर यांनी दिली. तरी पालकांनी स्नेहा नाईक ९४०५१६७०९९ किंवा सुजल गावडे ९५८८६८०३६४ यांच्याशी संपर्क साधावा.