हळदोणा वाताहार हळदोणे जिल्हा पंचायत कामाचा शुभारंभ*
हळदोणा साईनगर येथे साई मंदिराच्या प्रांगणाचा विकास व सौंदर्य वाढविण्याचा शुभारंभ जिल्हा पंचायत सदस्य सौ. मनिषा नाईक, माजी आमदार ग्लैन टिकलो, जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर,उपाध्यक्ष दिक्षा कांदोळकर ह्यांच्या हस्ते पेव्हर्स बसविण्याचा शुभारंभ करण्यात आला.
ह्या कामाचा एकूण अंदाजे खर्च ६. ५६लाख रूपये असून हा खर्च जिल्हा पंचायत निधीतून करण्यात येणार आहे. ह्या वेळी देवस्थानाचे अध्यक्ष विश्वास नाईक, स्थानिक पंचायत सदस्य गजानन हळदणकर, भाजपाचे उत्तर गोवा उपाध्यक्ष फ्रेंकी कार्व्हालो, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य श्रीकांत चोडणकर, उसकईचे सरपंच आनंद गडेकर, पंच प्रवंदना मयेकर, जाॅर्ज डिसोजा, बस्तोडचे माजी सरपंच साविओ मार्टिन्स, पंच तेजा वायंगणकर, कमलाकांत नाईक, माजी सरपंच फ्रांसिस, बूथ अध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ.मनिषा नाईक ह्यानी सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.