वामनराव पै यांना सावलीसारखी साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी सौ.शारदामाई यांचा वाढदिवस रविवार १७

.
वामनराव पै यांना सावलीसारखी साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी सौ.शारदामाई यांचा वाढदिवस रविवार १७ एप्रिल रोजी श्री महागणपती भवानी शंकर देवस्थान माडेल थिवि येथे साजरा करण्यात आला. कोविड काळानंतर प्रथमच सार्वजनिकरीत्या कार्यक्रम साजरा केल्यामुळे सर्व नामधारकांचा आनंद ओसंडून वाहत होता. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. “कन्यादान नव्हे तर कन्या प्रतिष्ठान करा” असे सद्गुरू नेहमी सांगतात. त्यानुसार सौ. माईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोव्यातील कर्तृत्ववान स्त्रियांचा प्रबोधक आणि सद्गुरूंच्या सत्शिष्या पुणेस्थित सौ.विभावरी येवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात कोरगाव येथील श्री कमळेश्वर हायर सेकंडरी स्कूलच्या प्राचार्या सौ. जुही थळी, गोव्यातील पहिल्या महिला पायलट कु. रिचा लवू गोवेकर तसेच जीवनविद्येच्या नामधारीका व पेशाने नर्स असलेल्या व कोविड काळात रुग्णांची सेवा केलेल्या सौ. सावंत यांचा समावेश होता. तिन्ही सत्कारमूर्तींच्यावतीने सौ. जुई थळी यांनी आपले मनोगत व्यक्त करून सन्मानाला उत्तर दिले.
त्यानंतर प्रमुख पाहुणे भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते विश्व प्रार्थनेच्या लखोट्याचं अनावरण करण्यात आले. ह्यावेळी मंचावर अात्माराम तिरोडकर, रोहिदास वायंगणकर, जीवनविद्या गोवा शाखेच्या अध्यक्षा सौ. राजश्री वायंगणकर, सचिव सौ.रत्ना बोलके, सत्कारमूर्ती सौ. किरण सावंत, सौ. जुही थळी, रिचा गोवेकर व प्रबोधिका सौ. विभावरी येवले उपस्थित होत्या. श्री तानावडे गेली १५ वर्षे जीवनविद्येच्या विचारांशी परिचित आहेत. त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांनी सद्गुरूंची दोनदा भेट घेऊन जीवनविद्येचा प्रसार जनमानसात कसा होऊ शकतो याबद्दल चर्चाही केली होती. जीवनविद्या मिशन गोवा शाखेने केलेल्या विनंतीनुसार जीवनविद्येचे विचार सरकारी पातळीवरून शैक्षणिक व सामाजिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यानी दिले.
कार्यक्रमात पुढे जीवनविद्येच्या बालसंस्कार वर्गातर्फे जीवनविद्येचे आराध्यदैवत श्रीकृष्ण, शिवाजी महाराज व आर्य चाणक्य यांच्यावर आधारित छोटीशी नाटिका सादर करण्यात आली. नाटक सादर करणार्‍या बालगोपाळांचे खूप कौतूक झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी विभावरी येवले यांचं “सुखी जीवनाची गुरुकिल्ली” या विषयांवर प्रबोधन झालं. संसारात राहूनही परमार्थ कसा साध्य करू शकतो हे त्यांनी काही उदाहरणं देऊन स्पष्ट केलं. कार्यक्रमाची सांगता कु. श्रद्धा वायंगणकर हिच्या आभारप्रदर्शनाने

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar