गोव्यात दाबोलीममध्ये क्रोमाचा शुभारंभ

.

गोव्यात दाबोलीममध्ये क्रोमाचा शुभारंभ
~अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची विशाल श्रेणी उपलब्ध असलेले रिटेल स्टोर क्रोमा दाबोलीममध्ये केशव स्मृती स्कूलजवळ प्रभूज् सिग्नेचरमध्ये सुरु झाले आहे~
~गोव्यामध्ये पोरवोरीमनंतर दाबोलीम येथे क्रोमाचे दुसरे स्टोर आहे~

२५ एप्रिल २०२२, गोवा: भारतातील पहिले व ग्राहकांचा विश्वास संपादन केलेले ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर, टाटा समूहातील क्रोमाने भारतामध्ये पर्यटकांचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या गोव्यामध्ये आपले दुसरे स्टोर दाबोलीममध्ये प्रभूज् सिग्नेचर येथे सुरु केल्याची घोषणा केली आहे.

विमानतळापासून जवळ असलेले दाबोलीम हे उद्योगव्यवसायासाठी तसेच गोव्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांचे प्रमुख केंद्र म्हणून तसेच गोव्यातील विविध समुद्रकिनारे आणि सुट्टी घालवण्याच्या इतर ठिकाणी जिथून सहज पोचता येते असे ठिकाण म्हणून लोकप्रिय आहे. क्रोमा दाबोलीम स्टोरमध्ये ५५० पेक्षा जास्त ब्रँड्सची १६००० पेक्षा जास्त उत्पादने उपलब्ध आहेत. विमानतळापासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर दाबोलीममध्ये केशव स्मृती स्कूलच्या जवळ प्रभूज् सिग्नेचर येथे अतिशय मोक्याच्या ठिकाणी क्रोमा स्टोर सुरु करण्यात आले आहे.

गोव्यामध्ये क्रोमाचे नवे स्टोर १३६०० चौरस फुटांच्या विशाल जागेत वसवण्यात आले असून यामध्ये दोन लेव्हल्स आहेत. टीव्ही, स्मार्टफोन्स, डिजिटल डिव्हायसेस, कूलिंग उत्पादने, घरगुती उपयोगाची उपकरणे तसेच ऑडिओ व संबंधित इतर ऍक्सेसरीज अशी विविध प्रकारची, अत्याधुनिक उत्पादने या स्टोरमध्ये उपलब्ध असून क्रोमाचे जाणकार, तज्ञ स्टोरमध्ये उपस्थित असल्याने ग्राहकांना खरेदी करताना आवश्यक ती सर्व माहिती व मदत सहज मिळते. क्रोमामध्ये करण्यात आलेल्या खरेदीचे जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी ग्राहक क्रोमाच्या खरेदीनंतरच्या सेवांबाबत माहिती करवून घेऊ शकतात किंवा तज्ञांचा सल्ला मिळवण्यासाठी स्टोर असोसिएट्सची मदत घेऊ शकतात किंवा विशेष आयोजित करण्यात येणाऱ्या लर्निंग ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होऊ शकतात.

क्रोमा इन्फिनिटी-रिटेल लिमिटेडचे एमडी व सीईओ श्री. अविजीत मित्रा यांनी सांगितले, “गोव्यामध्ये दाबोलीम येथे आमच्या नव्या स्टोरमध्ये ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी आमची कुशल, तज्ञ टीम अतिशय उत्सुक आहे. ग्राहकांसाठी नेमके चांगले काय हे सुचवून आमची टीम त्यांची उत्तम मदत करण्यात सक्षम आहे. नवनवीन, अत्याधुनिक उत्पादनांची श्रेणी आम्ही याठिकाणी सादर केली असून ग्राहकांना अनुकूल, विश्वसनीय सेवा, खरेदीनंतर देखील ग्राहक निश्चिन्तपणे उत्पादनांचा उपयोग करू शकतील अशा सेवा यांच्या बरोबरीनेच अनेक आकर्षक ऑफर्स देखील वेळोवेळी उपलब्ध करवून दिल्या जातील.”

क्रोमा दाबोलीम आठवड्याचे सातही दिवस सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठपर्यंत सुरु असते.

क्रोमा-इन्फिनिटी रिटेल लिमिटेड
क्रोमाची सुरुवात २००६ साली करण्यात आली. हे भारतातले अशाप्रकारचे पहिले लार्ज फॉरमॅट स्पेशालिस्ट रिटेल स्टोर आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सची डिजिटल गॅजेट्स व घरगुती वापराची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने उपलब्ध करवून दिली जातात. ‘प्रत्येक दिवस अधिक उज्वल’ हे क्रोमाने आपल्या ग्राहकांना दिलेले वचन असून त्याची पूर्तता करत असताना क्रोमाने जागतिक दर्जाचे वातावरण आणि खरेदीचा ओम्नीचॅनेल अनुभव ग्राहकांना मिळवून दिला आहे. स्टोरमध्ये येऊन किंवा www.croma.com वर ऑनलाईन देखील खरेदीची सुविधा क्रोमाच्या ग्राहकांना मिळते.

भारतात ७९ शहरांमध्ये २४५ पेक्षा जास्त क्रोमा स्टोर्स असून त्याठिकाणी ५५० पेक्षा जास्त ब्रँड्सची १६००० पेक्षा जास्त उत्पादने विकली जातात. प्रत्येक ग्राहकाचे उज्वल भवितव्य आजपासून सुरु झाले पाहिजे हा क्रोमाचा उद्देश आहे. क्रोमा हा टाटा ग्रुपचा एक भाग असलेल्या इन्फिनिटी रिटेल लिमिटेडचा ब्रँड आहे.

अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क साधावा:
क्रोमा-इन्फिनिटी रिटेल लिमिटेड
संयुक्ता लाल
9820792571
sanyukta.lal@croma.com

ऍडफॅक्टर्स पीआर
प्रियांका कुलकर्णी
9819393916
Priyanka.kulkarni@adfactorspr.com

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar