- संवाद कौशल्य, पाठांतर कला, सभा धीटपणा, अभिनय कौशल्य हे नाटकात महत्वाचे
असल्याचे उदगार नाटककार प्रकाश धुमाळ यांनी काढले
हळदोणा वाताहार -आपल्या अवतिभवती ज्या घटना घडतात त्यातून नाटकाची निर्मिती होते. नाटक हे महत्वाचे साधन असून ती कला आताच्या पिढीने अवगत करावी. संवाद कौशल्य, पाठांतर कला, सभा धीटपणा, अभिनय कौशल्य हे नाटकात महत्वाचे असल्याचे उदगार नाटककार प्रकाश धुमाळ यांनी सम्राट क्लब हळदोणा यांनी आयोजित केलेल्या नाट्यमहोत्सवाच्या उदघाटन समारंभावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना काढले.
यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर सम्राट क्लब हळदोण्याचे अध्यक्ष रवींद्र पणजीकर, सचिव सर्वेश नाईक, खजिनदार प्रेमानंद केरकर, गटाध्यक्ष विनोद मळीक, नाट्यमोहत्सव प्रकल्प अधिकारी तथा उपाध्यक्ष रमाकांत अणवेकर, माजी अध्यक्ष दिलीप हलदोणकर, संचालक संतोष नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना धुमाळ म्हणाले की, सम्राट क्लबने आजपर्यंत गोमाताकाची कला जपून ठेवली तसेच गोव्यातील नाट्य, संगीत कलाकारांनी भारत गोव्याचे नाव कलेच्या माध्यमातून उंचावले. म्हणून देशातील लोक गोव्यातील लोकांकडे पाहताना कलेच्या दृष्टीकोनातून पाहत असल्याचे ते म्हणाले. गोवा ही एक कलाकारांची खाण आहे. त्यामुळे येथील कलाकार गोव्याबरोबरच भारत देशात व परदेशात जाऊन आपले नाव अजरामर केले
मध्यंतरीच्या काळात म्हणजे काही वर्षांपूर्वी युवापिढी पाच्यांत्य स्वस्कृतिकडे भरकटत चाललेली होती. परंतु आता अभिमानाची गोष्ट म्हणजे हीच नवपिढी संगीत, भजन, नाटक, घुमट आरत्या सारख्या भारतीय संस्कृतिकडे वळली जात आहे. त्याबद्दल युवा पिढीला धुमाळ शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी नाटककार प्रकाश धुमाळ यांच्या हस्ते दीप प्रज्योलीत करून नाट्यमोहोतस्वाचे उदघाटन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक भाषण अध्यक्ष रवींद्र पणजीकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्याची ओळख नात्यामहोतस्वाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत अणवेकर यांनी केली. तर आभार सचिव सर्वेश नाईक यांनी मानले.
फोटो :-नाटककार प्रकाश धुमाळ यांचे स्मृतीचिन्ह देऊन गौरव करताना सम्राट क्लब हळदोणाचे अध्यक्ष रवींद्र पणजीकर सोबत इतर मान्यवर.