मराठी व भाषाशास्त्र विषयाचे अभ्यासक्रम उत्कृष्ट पद्धतीने विध्यार्थ्यांना शिकविण्यासाठीअध्यापक
मंडळींना शास्त्रशुद्ध व्याकरण व शुद्धलेखन पद्धती ज्ञात असावी ही गरज आहे.मात्र कंटाळवाणा भाग परंतु आवश्यक अश्या व्याकरण भागाची कार्यशाळाहा स्तुत्य उपक्रम घडवून आणल्याबद्दल गोमंतक मराठी अकादमी ,मांद्रे प्रभागाचे कौतुक असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.
हरमल पंचक्रोशी संस्थेच्या ज्ञानदा सभागृहात आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटन समारंभात बोलत होते.प्रथम आपण भाषा व अवतीभवतीच्या संवादातून व्याकरण विषय शिकत असतो.भाषेचा विकास होण्यास व्याकरण हा महत्वाचा घटक आहे.भाषा बोलताना व विशेषतः लिहिताना र्हस्व व दीर्घ पध्दत गंभीरपणे घेत नसतो व अनेक चुका घडत असतात तर कधीकधी र्हस्व दिर्घमुळे अर्थाचा अनर्थ सुद्धा घडतो ह्याचा अनुभव आपण कधीनकधी घेतला असतो.विध्यार्थ्यांच्या चुकीमुळे आपण गुणसंख्या कमी देत नसतो,मात्र त्या चुकीचा परिणाम जीवनांत होत असतो त्यामुळे चुकांची पुनरावृति होऊ नये हैसाठी विध्यार्थ्यांना चूक उमजून सांगणे महत्वाचे असल्याचे चेअरमन पार्सेकर यांनी व्यक्त केले.मराठी भाषेचे वैभव व्याकरणामुळे टिकवून ठेवण्यासाठी आम्ही अध्यापक व शिक्षक वर्गाने जबाबदारी घेतली पाहिजे,असे पार्सेकर यांनी व्यक्त केले.
गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा अनिल सामंत-
मराठी व्याकरणाची बीजे गोव्यात रुजविली त्या स्व अरुण फडके यांचे स्मरण होत आहे.व्याकरण हे भाषेचे अंतःकरण असून ते उमजून घेणे आवश्यक आहे.व्याकरणाची कार्यशाळा म्हटल्यानंतर सहजच शंका होती,मात्र आपल्या चेहऱ्यावर चैतन्य व प्रसन्नता दिसल्याने समाधान आहे.नव्या शैक्षणिक धोरणांत चैतन्यमय शिक्षणाचा उल्लेख आहे.नित्य नवीन शिकत राहणे व शिकवीत असले पाहिजे असा अर्थ होय.ही कार्यशाळा म्हणजे मराठीच्या वाटचालीत उत्कृष्ट व ऐतिहासिक पाऊल असून पेडणे तालुक्यातील मराठी अध्यापकाना लाभ होतो आहे.व्याकरण ही संपूर्ण भाषेची मुळं आहेत त्यांना वेळीच पाणी सिंचन झाले पाहिजे.मराठी राजभाषा पाहिजे त्यासाठी मुलांनी शिकायला,लिहायला व बोलायला पाहिजे.मराठीच्या सकारात्मक चळवळीत भाग घेऊन चैतन्य निर्माण होणे गरजेचे आहे.मराठी अकादमी शिक्षण,शास्त्र,संस्कृती अश्या अनेक क्षेत्रात कार्य करीत असून प्रत्येकाने सहकार्य करावे असे आपल्या ओघवत्या शैलीत प्राचार्य सामंत यांनी संबोधित केले.हरमल पंचक्रोशी संस्थेने सभागृह व नीटनेटके आयोजन करण्यात अमूल्य योगदान दिल्याबद्दल प्रा सामंत यांनी खास अभिनंदन केले.तालुका समूह समितीचे अध्यक्ष सुदन गांवकर यांनी कार्यशाळेचे फलित म्हणजे ज्ञान घेऊन गेल्यानंतर विध्यार्थ्यापर्यत त्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे व तसे कराल अशी अपेक्षा असल्याचे नाईक गांवकर यानी व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर कार्यशाळेचे मार्गदर्शक सौ आरती अच्युत घारे,हरमल पंचक्रोशी हायस्कुलच्या मुख्यध्यपिका स्मिता पार्सेकर,मांद्रे प्रभाग अध्यक्ष तथा सरकारी हायस्कुलचे मुख्याध्यापक नरेंद्र नाईक,तालुका समूह समितीचे अध्यक्ष तथा सरकारी हायस्कुल आगरवाडाचे मुख्याध्यापक सुदन नाईक गांवकर,मांद्रे प्रभाग समन्वयक प्रा गजानन मांद्रेकर
उपस्थित होते. प्रारंभी चेअरमन प्रा लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व सौ आरती घारे यांनी सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.हरमल पंचक्रोशी हायस्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदकडून स्वागतगीत सादर केले.त्यांना देवांग पालयेकर व राजू गांवकर यांनी साथसंगत केली.
यावेळी प्रभाग समिती सदस्य दिलीप मेथर,मांद्रे प्रभाग उपाध्यक्ष प्रा विठोबा बगळी, स्नेहा बुडके,दिया गडेकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सुत्रनिवेदन प्रा गजानन मांद्रेकर तर आभारप्रदर्शन सचिव सुभाष शेटगावकर यांनी केले.ह्या कार्यशाळेत पेडणे तालुक्यातील 225 शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
फोटो
हरमल—गोवा मराठी अकादमी मांद्रे प्रभाग व तालुका समूह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व्याकरण व शुद्धलेखन कार्यशाळेचे उदघाटन करताना प्रा लक्ष्मीकांत पार्सेकर सोबत प्रा अनिल सामंत,नरेंद्र नाईक व सुदन गांवकर,सौ आरती घारे व स्मिता पार्सेकर.