राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार गोव्यातील इतिहास अभ्यासक भावार्थ मांद्रेकर यांना जाहीर

.
राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार गोव्यातील इतिहास अभ्यासक भावार्थ मांद्रेकर यांना जाहीर
महाराष्ट्र सरकारमान्य मराठी साहित्य मंडळातर्फे देण्यात येणारा साहित्य क्षेत्रातील राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार गोव्यातील इतिहास अभ्यासक भावार्थ मांद्रेकर यांना जाहीर झाला आहे. भारतीय राष्ट्रीय इतिहासावर आधारित ” अद्वितीय रणसंग्राम” या पुस्तकासाठी मांद्रेकर यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
२०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला गोवा, महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील वाचक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्या या पुस्तकाची दुसरी आवृत्ती विचाराधीन असून त्याचा इंग्रजी अनुवादही होणार असल्याचे मांद्रेकर यांनी सांगितले.
गोमंतकीय इतिहासकार कै. पिसुर्लेकर यांच्या नंतर गोव्यातून राष्ट्रीय इतिहासावर प्रकाशीत झालेले अद्वितीय रणसंग्राम हे एकमेव पुस्तक आहे. १७५७ ते १८५७ या शंभर वर्षांच्या कालावधीत ब्रिटिशांनी भारतावर आपले साम्राज्य स्थापन करताना पदोपदी त्यांना भरतीयांकडून कसा प्रखर संघर्ष करावा लागला याचा चित्तथरारक इतिहास या पुस्तकातुन लेखकाने मांडला आहे. ललित साहित्य शैलीत इतिहास मांडला गेल्याने तो कोणत्याही वयोगटातील वाचकवर्गाला आणि विशेषतः इतिहासाची आवड नसलेल्या वाचकालाही वाचावासा वाटतो हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
मराठी मंडळाचा या सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराचे वितरण ठाणे, महाराष्ट्र येथे दि २१ मे रोजी होणार

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar