शेतजमिनीत शेती करणे हा गुन्हा आहे का ?

.

नगरनियोजन मंत्री सुडाचे राजकारण करीत असून त्यांचा बोलविता धनी वेगळाच असण्याची शक्यता आहे कारण मंत्री राणे वैयक्तिक पाळीवर उतरले आहेत अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी दिली.
पर्रा येथे सखल भागात बेकायदेशीर भराव टाकल्याप्रकरणी उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी मायकल लोबो व डिलायला लोबो यांच्या विरोधात एफआयआर नोंद केला, त्याचा खुलासा देण्याकरिता मायकल लोबो यांनी पर्रा येथील ‘त्या ‘ जागेत पत्रकार परिषद घेतली.
मंत्री राणे सोशल मीडियावर खोटी पोस्ट दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या जागेत आपण बागायती करीत आहे तेथील नैसर्गिक तळे साफ करताना काढलेली माती आपल्याच जागेत टाकण्यात आली होती तीही हटवण्यात आली आहे, या ठिकाणी एक पंप हाऊस व एक टॉयलेट बांधण्यात आलेला आहे, अन्य कोणतेही बांधकाम नाही. या करिता नगरनियोजन खात्याने रितसर परवानगी दिली आहे. आपल्यावर म्हणजे विरोधी पक्षनेत्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी मंत्री राणे यांनी अधिकाऱ्यांना वेठीस धरले आहे अधिकाऱ्यांना कामावरून निलंबित करण्याची व कायदेशीर करावाईची मंत्री राणे यांनी कालच जाहीर धमकी दिली होती ते हि कारवाई करून आपण कर्तबगार मंत्री असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मागच्या सर्व सरकारात तयार करण्यात आलेले ओडिपी रद्द करणे म्हणजे मूर्खपणा होय. त्यांच्याच सरकारतील मंत्र्यांनी ओडिपी तयार केले होते, त्या ओडिपी वर सह्या करणारे सर्व अधिकारी आताही तेच आहेत. तयार ओडिपी रद्द करण्यावर ते मंत्री व अधिकारी गप्प का ? त्यांनी चुकीच्या ओडिपी वर सह्या केल्या होत्या का ? असा सवाल लोबो यांनी पत्रकार परिषदेत केला.
लवकरच आपण मुख्यमंत्र्याची भेट घेणार असून या बाबत विधानसभेत आवाज उठवणार. मंत्री राणे यांनी मोठया व्यवसायिकांना भू माफिया म्हणून डिवचले आहे. नगरनियोजन खात्यात आता सिंगल विंडो राहिलेला नसून येत्या काही दिवसात वाढलेल्या विंडो लोकांना दिसतील असेही लोबो यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar