पीर्ण महा शालेय संकुल परिवाराच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे औचित्य साधून सरकारी माध्यमिक विद्यालय ,मेणकुरे येथील राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त अध्यापक श्री गोपाळ धर्मा सावंत पुरस्कार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत असताना तानावडे यांनी सत्कार मूर्ती श्री गोपाळ सावंत यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रती असलेल्या समर्पित वृत्तीचे कौतुक करून त्यांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांसाठी कार्यरत राहावे असे आवाहन उपस्थित शिक्षकाना केले. यावेळी व्यासपीठावर पीर्ण महाशालेय संकुलाचे अध्यक्ष प्राचार्य उमेश नाईक, सचिव प्रा.रामचंद्र नाईक देसाई,श्री शांतादुर्गा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजननिता सावंत, सरकारी माध्यमिक विद्यालय वजरीच्या मुख्याध्यापिका ममता नाईक, सरकारी माध्यमिक विद्यालय मेंणकुरेच्या मुख्याध्यापिका सर्वदा गावकर हे मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य उमेश नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकपर संबोधनातून पीर्ण महाशालेय संकुल परिवाराचे अध्यक्ष या नात्याने सर्व शिक्षकांनी रचनात्मक सहयोग करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत राहण्याची गरज व्यक्त केली प्रमुख पाहुणे सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते
शाल ,श्रीफळ तसेच मानपत्र देऊन सत्कारमूर्ती गोपाळ सावंत यांना गौरविण्यात आले. आज संपन्न झालेला हा सत्कार माझ्यावर आई वडिलांनी केलेले संस्कार तसेच सहकारी शिक्षकांनी केलेल्या सहकार्याची निष्पत्ती आहे असे सत्कारमूर्ती गोपाळ सावंत यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. पीर्ण महाशालेय संकुल परिवारातर्फे
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली होती त्यातील पारितोषिक प्राप्त खालील विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते याप्रसंगी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
मोठा गट- कुमारी सायली शरद नाईक-प्रथम सरकारी माध्यमिक विद्यालय मेणकुरे , कुमारी मधुरा निवृत्ती च्यारी-द्वितीय श्री शांतादुर्गा विद्यालय पीर्ण ,कुमारी तेजस्विनी विठ्ठल पाटील-तृतीय सरकारी माध्यमिक विद्यालय वजरी, सुजाता रवी चव्हाण-उत्तेजनार्थ सरकारी माध्यमिक विद्यालय रेवोडा नादोडा
छोटा गट-कुमारी दिव्या धाकटू गाड-प्रथम, सरकारी माध्यमिक विद्यालय मेणकुरे, गुंजन साईनाथ तळणकर-द्वितीय, सरकारी माध्यमिक विद्यालय रेवोडा नादोडा , निशाका रुपेश झोरे-तृतीय सरकारी माध्यमिक विद्यालय मेणकुरे, , श्रीशा सतीश चोडणकर- उत्तेजनार्थ श्री शांतादुर्गा विद्यालय पीर्ण , संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका अपूर्वा सावंत यांनी केले तर सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक रामचंद्र नाईक देसाई यांनी केले .प्राध्यापिका गंधाली परब यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या मनोभूमीत संस्काराची बीजे पेरणारा शिक्षक हा खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाचा किमयागार असतो असे प्रतिपादन पीर्ण ग्राम सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे यांनी केले
.
[ays_slider id=1]