गोव्यातील पहिल्या कचरा व्यवस्थापन स्टार्ट-अपची घोडदौड

.

कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील गोव्यातील पहिले स्टार्टअप असणाऱ्या यिंबी (इनोव्हेटिव्हा वेस्ट एड अँड मॅनेजमेंट)ची वाटचाल मुख्यमंत्र्यांच्या “स्वयंपूर्ण गोवा” च्या व्हिजनच्या मार्गावर सुरू आहे. या स्टार्टअपची स्थापना कोरोना महामारीच्या प्रारंभी झाली असूनही यिम्बिने नफा कमावला आहे आणि एचएनआय तसेच कॉर्पोरेट फर्मकडून गुंतवणूक आकर्षित केली आहे. यिंबी ही गोव्यातील स्टार्ट-अप असून कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात इतर गोमंतकीयांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.

उद्घाटन समारंभाला पर्यटन, आयटी, मुद्रण आणि स्टेशनरी मंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खवंटे, म्हापसाचे आमदार तसेच जीएसायडिसीचे उपाध्यक्ष जोशुआ डिसूझा आणि म्हापसा नगरपरिषदेच्या सभापती शुभांगी वायंगणकर आदी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमात दिवंगत श्री अॅड.फ्रान्सिस डिसोझा यांच्या स्मरणार्थ “शहरी आणि ग्रामीण हवामान बदल आणि शाश्वतता शिखर परिषद” सुरू करण्याची घोषणा केली. ही घोषणा रिस्पॉन्सिबल अर्थ फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था आणि यिंबीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

 

या कार्यक्रमामध्ये नवीन लोगो आणि ई-कॉमर्स वेबसाइटचे अनावरणही करण्यात आले. यामध्ये इको-फ्रेंडली उत्पादनांची विस्तृत श्रेणी असून यामधील नफा फाउंडेशनसाठी दान करण्यात येणार आहे.

 

यिंबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गौरव पोकळे म्हणाले, “कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील व्यवस्थापनावर वन स्टॉप सोल्युशन देणारी यिंबी ही देशातील एकमेव कंपनी असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. सध्या आम्ही गोव्यात संपूर्णपणे कार्यरत असून लवकरच देशभरात शाखा सुरू करण्याबाबत आशावादी आहोत. राज्यातील शाश्वत विकासाच्या दिशेने हे एक पाऊल पुढे आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar