म्हापसा येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या कुशे उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य सुभाष कौठणकर हे सेवा निवृत्त झाल्याने त्यांचा संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोकळे यांच्या हस्ते श्रीफळ, व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला

.

यावेळी श्रीकृष्ण पोकळे यांनी त्यांना पुढील आयुष्यात शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक किरण नाटेकर, प्राचार्य देवेंद्र केनावडेकर, व्यावसायिक शाखेचे इनचाज उपप्राचार्य सुभाष नेरुरकर, तसेच जेष्ठ शिक्षिका शिलाई सौजा उपस्थित होत्या. ३५ बर्षा च्या सेवेनंतर शिक्षक पेशातून निवृत्त होत असल्याने यावेळी प्रा. आत्माराम आरोलकर, दिलीप पालसरकर, प्रा . प्रतिभा चोडणकर, लोरीन कारास्को, रोहन मणेरीकर यांचीही भाषणे झाली. प्रा. राजाराम नावैकर व अकिलीया परेरा यांनी सतकार मूर्ती सुभाष कौठणकर यांची मुलाखती द्वारे शैक्षणिक जीवन प्रवास उलगडला. सतकार सोहळ्यात सुरू वातीला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीनी मिळून सादर केलेल्या स्वागत गीताने सुरूवात झाली.
प्रा. राजाराम नावैकर यांनी सुत्रसंचालन केले तर क्रिस्टिना कुरीया कोस हीने आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar