हरमल पंचक्रोशी संस्थेच्या ज्ञानदा सभागृहात शिबीर संपन्न झाले

.

येथील ग्रामवर्धिनी व कला, संस्कृती खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 22 दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिरातील विध्यार्थ्यांनी सरस व उदबोधक नाटिका सादर करून वाहवा मिळवली.हरमल पंचक्रोशी संस्थेच्या ज्ञानदा सभागृहात शिबीर संपन्न झाले.

गोवा कला व संस्कृती खात्याचे नाट्यप्रशिक्षक ज्ञानेश्वर पार्सेकर व तारा पार्सेकर यांनी ह्या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले.प्रथमच ग्रामवर्धिनी संस्थेने विद्यार्थ्यांसाठी योजनाबद्ध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.ह्या शिबिरात 185 विध्यार्थ्यांनी भाग घेऊन नाट्यकलेविषयी आस्था दाखवली व नामवंत मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण घेतले.ह्यावेळी विधर्थ्यांचे तीन गट करून प्रशिक्षक पार्सेकर यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले.

ह्या तिन्ही गटांनी दोन ज्वलंत विषयांवर भाष्य व जनजागृती करणारी नाटिका सादर केली.मोबाइल व्यसनाधीनता ह्या विषयावर मुलांनी चांगला अभिनय करून वाहवा मिळवली.मुलांचे लाड,त्यांना वस्तू देण्याचे आमिष तसेच शाळांचा अभ्यास व डोळ्यांची समस्या मांडून विध्यार्थ्यांना व्यसनाधीन न बनवता गरजेपुरते वापराचा संदेश दिला.दुसऱ्या नाटिकेत, कचरा समस्या सध्या आवासून भेडसावत आहे.परिसरात तसेच अवतीभोवती शून्य भावनेने निसर्गाला ठेच देत असून त्यात शिक्षित लोकही सामील होत असल्याचे दाखविले.कचरा व निसर्गसुंदर हिरवाई झाडांचे अस्तित्व टिकवून ठेवले पाहिजे तसेच शौचालयाचा वापर करून निसर्गाचे रक्षण केले पाहिजे,असा संदेश विद्यार्थ्यांत व पालकांना दिला.तिसरी नाटिका ही शिवाजी जन्मोत्सव सादर केली होती.

हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेने केवळ शिक्षणाचं क्षेत्रात कार्यरत नसून विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीव व्यक्तिमत्व विकासासाठी शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न केले हा संदेश दिल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.या प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमास कला,संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब उपस्थित होते. त्यांनी ग्रामवर्धिनी व हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचा मुक्तकंठाने गौरव केला.संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ग्रामवर्धिनीच्या पदाधिकारी व शिक्षण संस्थेच्या सहकार्याबद्दल कौतुक केले.नाट्यप्रशिक्षकसोबत पंचक्रोशी चे संगीत शिक्षकदशरथ नाईक,मकरंद परब,जिग्नेश पेडणेकर तसेच प्रा डॉ विभा लाड व प्रगती साळगांवकर यांनी साहाय्य केले.
ग्रामवर्धिनी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष देवानंद कुडव तसेच अर्जुन खोर्जे,अभय नाईक,गुरुदास नानोस्कर उपस्थित होते.
प्रारंभी सचिव अर्जुन गडेकर यांनी सुत्रनिवेदन तर खजिनदार संदीप गावडे यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar