कोरकणवाड्यावरील श्री राष्ट्रोळी देवस्थानच्या वर्धापणदिनाचे औचित्य साधून यशस्वी विध्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा गृहनिर्माण महामंडळाचे चेअरमन जित आरोलकर यांच्याहस्ते अतिरिक्त पंचायत संचालक उमाकांत कोरकणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

.

कोरकणवाड्यावरील श्री राष्ट्रोळी देवस्थानच्या वर्धापणदिनाचे औचित्य साधून यशस्वी विध्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा गृहनिर्माण महामंडळाचे चेअरमन जित आरोलकर यांच्याहस्ते अतिरिक्त पंचायत संचालक उमाकांत कोरकणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कोरकण वाडा श्री राष्ट्रोळी देवस्थानच्या प्रांगणात सोहळा संपन्न झाला. विध्यार्थ्यांनी शिक्षणाचा पाया मजबूत केला पाहिजे.अलिकडे विध्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा हाकेच्या अंतरावर उपलब्ध असून केवळ इच्छाशक्तीच्या बळावर लाभ घेतला पाहिजे.ह्या वाड्यावरील व्यक्ती गोवा शासनात उच्च पदी असल्याचा गर्व असणे स्वाभाविक आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत विध्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाने उच्च शिखरे पादाक्रांत करावी.विध्यार्थ्यांना कसलीही अडचण असल्यास त्यांच्या प्रगतीसाठी आपला सदैव पाठिंबा असेल,असे आमदार जित आरोलकर यांनी व्यक्त केले.आपण कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण केले व लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देत रुजू झालो.आजच्या विध्यार्थ्यांनी पदवी वा पदविका न घेता, जीपीएससी आदी स्पर्धात्मक परीक्षा दिल्या पाहिजे.विध्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासली पाहिजे व त्यासाठी आपण स्मृतिचिन्ह बरोबर एक उपयोगी पुस्तक भेट दिली आहे,जेणेकरून त्यात यशवंत,हुषार व कठीण परिस्थितीवर यशस्वी लढा देत जीवनाचे सार्थक केलेले दिसून येईल. यंदाच्या वर्षी पेक्षा पुढील वर्षात बक्षिसे प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे व तेच खरे फलित पाहिजे,असे मत अतिरिक्त पंचायत संचालक उमाकांत कोरकणकर यांनी व्यक्त केले.यशस्वी विध्यार्थ्यांना बक्षिसे तसेच श्री राष्ट्रोळी देवस्थानच्या उत्सवात महाप्रसादाचा लाभ उमाकांत कोरकणकर यानी पुरस्कृत केला होता.यावेळी वैष्णवी भिवा मांद्रेकर,अथर्व अरुण बांधकर,सोहम प्रदीप कोरकणकर, शिवप्रसाद प्रदीप तुळस्कर, पूर्वा जनार्दन कोरकणकर, मयूर मुकुंद कोरकणकर, शांभवी उदय बांधकर,शुभम प्रभाकर बानकर व निकिता सुनील कोरकणकर यांचा स्मृतिचिन्ह व पुस्तक भेट देऊन गौरव केला.यावेळी व्यासपीठावर माजी जीपं सदस्य अरुण बांधकर,संतोष कोरकणकर, विष्णू बानकर,शिवानंद दाभोलकर, देवेंद्र केपकर,संजय म्हामल उपस्थित होते.सुत्रनिवेदन प्रतीक दिलीप कोरकणकर व शशिकांत कोरकणकर तर निकिता कोरकणकर हिने आभार मानले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar