केरी न्यू इंग्लिश हायस्कुलच्या मुख्याध्यापिका फर्नांडिस आणि ज्येष्ठ शिक्षक आबा नाईक यांचा सत्कार

.

हरमल दि: ८ प्रतिनिधी

केरी न्यू इंग्लिश हायस्कुच्या मुख्याध्यापिका बर्था फर्नांडिस आणि ज्येष्ठ शिक्षक नवसो उर्फ आबा नाईक यांचा निवृतिनिमित्त सत्कार करून त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

शाळेच्या सभागृहात आयोजित या विशेष सोहळ्याला बर्था फर्नांडीस यांच्यासोबत शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन गणू वस्त, सचिव पांडुरंग सावंत, व्यवस्थापक संजय कास्कर, माजी चेअरमन नारायण सोपटे केरकर, हायस्कुलच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष गंगाराम मठकर, उपाध्यक्ष जयंती नार्वेकर , प्राथमिक विभाग पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष मधुकर रांगणेकर आणि भावार्थ मांद्रेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीत शिक्षक दिलीप रेडकर यांनी तू बुद्धी दे प्रार्थना आणि अशी पाखरे येति हे गाणे सादर करून सर्वांचे स्वागत केले. त्यांना यशवंत शेट्ये यांनी तबला साथ केली.

पांडुरंग सावंत यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात दोन्ही निवृत्त शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

येत्या शैक्षणिक वर्षांपासून केरी न्यू इंग्लिश हायस्कुचे मुख्याध्यापक म्हणून ताबा घेणारे शिक्षक भावार्थ मांद्रेकर यांचा यावेळी परिचय करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी भावार्थ मांद्रेकर यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यवस्थापन आणि समाजाने एकत्रित येऊन संघटितपणे कार्य केल्यास शाळेची भरभराट निश्चित होईल अशी आशा व्यक्त केली.

शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका निषिता आकरकर, सत्यवान हर्जी, निकिता मठकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

निवृत्त मुख्याध्यापिका बर्था फर्नांडीस यांचा चेअरमन गणू वस्त यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. फर्नांडिस यांनी यावेळी बोलताना शाळा, सहशिक्षक, व्यवस्थापनाने दिलेल्या सहकार्याबद्दल आपली कृतज्ञाता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका नीलम महालदार यांनी केले. तर गणू वस्त यांनी आभार मानले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar