विद्या भारती संचालित श्री शांता विद्यालय सडये , शिवोली
व पिपल्स हायस्कूल कामुर्ली यांच्या सहकार्याने ७ ते १४ या
वयो गटातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी सात दिवसांचे
जाणीव जागृती शिबीर नुकतेच सुरळीत पार पडले.
विद्यार्थ्याला त्याच्या अंगीकृत सामर्थ्याची जाणीव होऊन
जीवनामध्ये तो सर्वार्थाने ‘ समर्थ ‘ बनावा या सद् हेतूने
सरकारी प्राथमिक विद्यालय करासवाडा येथे २३ एप्रिल २०२२
ते २९ एप्रिल २०२२ या कालावधीमध्ये जाणीव जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रोज सकाळी ८.३० ते ११.३० पर्यंत वैचारिक सामर्थ्य , आत्मबल वाढवणारी तसेच विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये विकसित करणारी सत्रे घेण्यात आली.
दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजी सरकारी प्राथमिक विद्यालय करासवाडा येथे जाणीव जागृती बाल शिबीराचा उद्घाटन सोहळा पार पडला.
या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून करासवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. संगीता उमाकांत वायंगणकर उपस्थित होत्या. तसेच विद्या भारती गोवा प्रांताचे सह संघटन मंत्री श्री पुरुषोत्तम कामत सर , पिपल्स हायस्कूल कामुर्लीचे मुख्याध्यापक श्री संदीप पाळणी सर , श्री शांता विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री कमलाकांत वायंगणकर सर , भारतीय योग विद्याधाम शिवोली शाखेचे योग शिक्षक श्री शाम वायंगणकर सर , पिपल्स हायस्कूल कामुर्ली व श्री शांता विद्यालयाचे प्राथमिक शिक्षक व वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी गण उपस्थित होते.
या सात दिवसात रोज सकाळी शिक्षिका कु. पूजा शेट्ये
यांनी मुलांना प्रार्थना सत्र घेतले. तसेच भारतीय योग विद्याधाम
शिवोली शाखेचे योग शिक्षक श्री शाम वायंगणकर यांनी योगा सत्र घेतले.
शिबिराच्या पहिल्या दिवशी शिक्षिका कु. आरती गवस यांनी गीत गायन सत्र, दुसऱ्या दिवशी शिक्षिक श्री उमेश महालकर यांनी कथाकथन सत्र, तिसऱ्या दिवशी निवृत्त शिक्षक श्री रावजी जाधव यांनी हस्ताक्षर सत्र, चौथ्या
दिवशी सौ. उषा कामत आणि सौ ऋचा केळकर यांनी संस्कृत सुभाषित सत्र, पाचव्या दिवशी श्री औदुंबर शिंदे यांनी वैदिक गणित सत्र , सहाव्या दिवशी कु. उमा प्रभुदेसाई यांनी भरतनाट्यम नृत्य सत्र आणि सातव्या दिवशी शिक्षिका सौ. प्रगती नाईक यांनी व्यक्तिमत्त्व विकास सत्र घेतले.
शेवटी दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी निरोप समारंभाने या जाणीव जागृती शिबिराची सांगता करण्यात आली.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून करासवाडा येथील लोकप्रिय असे ग्रामस्थ श्री नागेश गणेश , पिपल्स हायस्कूल कामुर्लीचे मुख्याध्यापक श्री संदीप पाळणी सर , श्री शांता विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक श्री कमलाकांत वायंगणकर सर ,करासवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. संगीता उमाकांत वायंगणकर , पिपल्स हायस्कूल कामुर्ली व श्री शांता विद्यालयाचे प्राथमिक शिक्षक व वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी गण उपस्थित होते.