_*सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक*_
दिनांक ८/५/२०२२
फोंडा येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फूल्लिंग चेतवले
फोंडा, ८ मे – सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून फोंडा येथे हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले. हिंदू एकता दिंडीला स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
हिंदू एकता दिंडीला राजीव गांधी कला मंदिरापासून धर्मध्वजपूजनाने प्रारंभ झाला. प्रारंभी स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती यांनी धर्मध्वजाचे पूजन केले, तर सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. जयंत मिरींगकर यांनी नारळ वाढवला. स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती यांनी दिंडीमधील पालखीतील परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन केेले. यानंतर दिंडीला प्रारंभ झाला. यानंतर दिंडी श्री विठोबा मंदिर-वरचा बाजार-टपाल कार्यालयाजवळ या मार्गाने जाऊन तिचे तिस्क-फोंडा येथे एका लहान सभेत रूपांतर झाले. दिंडीच्या समोर धर्मध्वज, मागे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र असलेली दिव्य चैतन्यदायी पालखी आणि पालखीच्या दोन्ही बाजूंनी नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनींचे नऊवारी कलश पथक, स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवणारी स्वरक्षण पथके, बाल साधक कक्ष, प्रथमोपचार पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवणारे ‘रणरागिणी’ पथक, टाळ-मृदंग घेतलेले ‘ईस्कॉन’चे पथक, असे दिंडीचे स्वरूप होते. दिंडीमध्ये हातात झेंडे घेऊन विविध घोषणा देत सनातन संस्थेचे हितचिंतक, विविध संप्रदायाचे अनुयायी सहभागी झाले होते. दिंडी जात असतांना तिचे वाटेत धर्मध्वजाची आरती ओवाळून अनेकांनी स्वागत केले. सभेच्या अखेर झालेल्या लहान सभेत स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती म्हणाले, ‘‘हिंदूंनी आत्मरक्षणासाठी सज्ज राहिले पाहिजे. हिंदूंनी कोणताही भेदभाव न बाळगता संघटित झाले पाहिजे’’. ह.भ.प. सुहासबुवा वझे म्हणाले,‘‘काळ साद घालत आहे की ‘हिंदू एक व्हा’. धर्म टिकला, तरच आम्ही टीकणार आहे. प्रत्येक हिंदूने आपला अहंकार दूर ठेवून एकत्र आले पाहिजे.’’ सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस म्हणाले,‘‘ हिंदुऐक्याचा आविष्कार दर्शवणारी ही सांप्रदायिक एकता सदैव हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी वारंवार दिसून आली पाहिजे. हिंदूंची आई-बहिणी आणि मंदिरे सुरक्षित झाली पाहिजे. जोपर्यंत हे हिंदु ऐक्य अबाधित राहील, तोपर्यत गोमंतक सुरक्षित राहील, याची निश्चिती बाळगा.’’ हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी म्हणाले,‘‘ आज प्रत्येक हिंदूने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात यथाशक्ती योगदान देण्याचा निश्चय करावा.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल वझे यांनी केले.
आपला विश्वासू,
*श्री. तुळशीदास गांजेकर*,
सनातन संस्थेकरिता
(संपर्क क्रमांक : ९३७०९ ५८१३२)