महिला पतंजली योग समितीतर्फे साखळी येथील रवींद्र भवन येथे स्वामी परमार्थदेवजी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 13 मे ते 15 मे यादरम्यान तीन दिवसीय योगोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातील उपस्थित योग साधकांना व्यायाम, आसने, प्राणायाम, मुद्रा तसेच संयुक्त उपचार पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हवन उपचारपद्धतीद्वारा पहिल्या दिवसापासून हवानाद्वारे विविध रोगांवर उपचार केले जातील तसेच तज्ञ योगशिक्षकांद्वारे संयुक्त उपचार पद्धतीचे मार्गदर्शन केले जाईल.
या शिबिराच्या समापनादिवशी म्हणजेच दिनांक १५ मे रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात खास हरिद्वारहून वैदिक तत्त्वज्ञान या विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेल्या आणि महिला पतंजली योग समितीच्या मुख्य केंद्रीय समन्वयक तथा लेखिका, अध्यात्मिक वक्ता, २७ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असलेल्या आचार्या डॉ. साध्वी देवप्रिया या महिलांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सकाळी ५.०० ते ७.०० यावेळेत मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर गोव्याच्या प्रथम महिला नागरिक प्राध्यापिका सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत या सकाळी ९ ते १२ या खास महिलांसाठीच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच परमपूज्य स्वामी रामदेव बाबा यांचे परमशिष्य व मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी परमार्थदेवजी यांची पावन उपस्थिती तसेच मार्गदर्शन लाभणार आहे.
तरी सर्व गोमंतकीयांनी तसेच विशेष करून महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.