पंचायत राज कायद्या विषयी जनजागृती करून पंचायत निवडणुकीत योग्य आणि समाजाभिमुख उमेदवार निवडून आणण्याची खबरदारी नव्याने स्थापन करण्यात आली

.

पंचायत राज कायद्या विषयी जनजागृती करून पंचायत निवडणुकीत योग्य आणि समाजाभिमुख उमेदवार निवडून आणण्याची खबरदारी नव्याने स्थापन करण्यात आलेली स्वराज्य संस्था घेईल तसेच मांद्रेचा सुनियोजित विकास घडवू आणील गावचे अस्तित्व कायम राखू असे प्रतिपादन नव्यानेच मांद्रेत स्थापन झालेल्या स्वराज्य या संस्थेचे अध्यक्ष एड.किशोर शेटमान्द्रेकर यांनी सांगितले .
मांद्रे येथील जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेस संस्थेचे सचिव तुषार गोवकर,खजिनदार संदेश सावंत, कार्यकारिणी सदस्य सर्वश्री जगन्नाथ पार्सेकर,एड प्रसाद शहापूरकर,विश्वनाथ शिरोडकर, शंकर गोवेकर,महेश गोडकर,लाडू पुरखे,मेघश्याम मांद्रेकर,केशव मांद्रेकर,आग्नेल फर्नानंडीस ,डॉ जोसेफ् फर्नानडीस आदी उपस्थित होते.
एड किशोर शेटमांद्रेकर यावेळी माहिती देताना पुढे म्हणाले ,मांद्रे गाव सुरक्षित ठेवून नियोजनबध्द विकास करण्याचा संकल्प करून समविचारी नागरिकांनी एकत्र येऊन स्वराज्य या संस्थेची स्थापना केली आहे या संस्थेत सर्व क्षेत्रात वावरणाऱ्या होतकरू युवकांचा समावेश आहे.पंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंचायत कायद्या विषयी जनजागृती घडवून आणण्याचे प्राथमिक काम ही संस्था करणार आहे.परप्रांतीयांच्या अतिक्रमणामुळे मांद्रे गावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे त्यासाठी गावात शिरकावं झालेल्या गैर गोष्टी नाहीश्या करण्यासाठी सक्षम पंचायत मंडळाची गरज आहे भकास होत असलेले डोंगर,अतिक्रमीत होत असलेले समुदाकिनारे आणि किनाऱ्यावरील अनैतिक गोष्टी यापासून गावाची सुटका करण्याचा विडा या संघटनेने उचलला आहे गावच्या पाणी ,विज जमीन कचरा आदी समस्या दूर करण्यास संघटना प्राधान्य देईल त्यासाठी गावच्या विकासात शिक्षित युवकांचा सहभागी करून घेतले जाईल.एकूणच मांद्रे गाव आदर्श गाव म्हणून पुढे आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील असे ते म्हणाले.
मंद्रेच्या विकासात सहभागी करून घेण्यासाठी इथल्या प्रत्येकाला सहभागी करून घेऊ.ही संस्था कुठल्याही एका राजकीय पक्षाशी बांधील राहणार नाही याची खबरदारी आम्ही निश्चित घेऊ.मंद्रेची कला,संस्कृती ,पर्यावरण आदीचा आम्ही प्राणपणाने सांभाळ करू.विकासाचा एक आदर्श नमुना तयार करून विकासाला चालना देऊ.
येणारी पंच्यायत निवडणूक आमचे ध्येय नसले तरी संस्थेच्या विचाराशी आणि गावच्या अस्तित्ववाचा प्राधान्याने विचार करणाऱ्या उमेदवारांना आमचा पाठिंबा निश्चित राहील असेही ते म्हणाले एकून गावच्या विकासावर सर्वोतोपरी दृष्टी ठेवून अनैतिक गोष्ठीवर अंकुश ठेवण्याचे काम आमची संस्था करील.या शिवाय पेडणे तालुक्याच्या विकासात ही संस्था आपले योगदान देणार आहे असे त्यांनी पुढे सांगितले.
जगन्नाथ पार्सेकर म्हणाले,मांद्रे गावाचे डोंगर,समुद्र किनाऱ्यांचे अस्तित्व कायम राखण्यासाठी संस्था काम करेल.त्याच बरोबर स्वार्थासाठी परप्रांतीयाच्यास घश्यात जमिनी लाटणाऱ्यावर अंकुश ठेवण्याचे काम करू.ऐकुन् गावाच्या विकासाला योग्य दिशा देऊ. गावचे अस्तित्व टिकवु असे सांगितले
विश्वनाथ शिरोडकर म्हणाले,गावातील समविचारी नागरिकांनी स्वराज्य संघटना स्थापन केली आहे आजवर आम्ही गावच्या विकासासाठी वैयक्तिक प्रयत्न केले यापुढे संस्थेतर्फे सांघिक प्रयत्न करू .
शंकर गोवेकर म्हणाले,पंचायत राज कायद्यात नागरिकाचे हक्क कोणते आणि त्याची कर्तव्य काय या विषयी आम्ही एक डॉक्युमेंटरी करून अकराही प्रभागात जनजागृतू करणार असल्याचे सांगितले.
एड प्रसाद शहापूरकर म्हणाले संस्थेच्या प्रत्येक सदस्यात गावाविषयीं तळमळ आहे संवेदनशील असलेल्या या युवकांकडे गावच्या विकासाचे एक व्हिजन आहे मांद्रे गावाच्या समुद्र किनारे डोंगर याकडे परप्रांतीय आकर्षित झाले आहेत त्यांची वाईट नजर या गावाचे अस्थित्व नष्ठ करणार आहे अश्या लोकापासून गाव सुरक्षित ठेवण्याची गरज आहे समाजिक क्षेत्रातील लोकांचा आवाज बुलंद करण्याचे काम संघटना करणार आहे असे सांगितले
खजिनदार संदेश सावंत म्हणाले, मांद्रे पंचायत क्षेत्रातील अनैतिक गोष्टी विरुद्ध आम्ही अनेकदा आवाज उठवला मात्र आमच्यावर अनेकदा दबाव आणण्याचा प्रयत्नही झाला आजावर आम्ही त्याला बळी पडलो नाही या पुढे संघटित पणे अश्या गैर शक्ती विरुद्ध आवाज उठवू वाईट गोष्ठीपासून गावाला दूर ठेवू असे सांगितले मतदारांना लाचार करून आपले इप्सित साद्य करू पाहणाऱ्यांस धडा शिकवू असे सांगितले.
0510 MANDRE
मांद्रे येथे नव्यानेच स्थापन झालेल्या स्वराज्य संघ टणे विषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना एड किशोर शेट मंद्रेकर ,बाजूला जगन्नाथ पार्सेकर,तुषार गोवेकर, संदेश सावंत,शंकर गोवेकर,एड प्रसाद शहापूरकर व अन्य पदाधिकारी

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar