जायन्ट्स ग्रुप ऑफ पणजीतर्फे जागतिक परिचारिका दिवस नुकताच फोमेंतो सभागृहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आरोग्य खात्याचे माजी संचालक डॉक्टर जुझे डिसा, यांच्या हस्ते अलका नायक, सेवानिवृत्त मॅट्रॉन, ओसलिंडा नाझारेत वाझ फर्नांडेस, वॉर्ड सिस्टर, संध्या संदेश बांदकर, वॉर्ड सिस्टर, राजश्री रोहिदास नाईक, वॉर्ड सिस्टर आणि विंदा गोविंद कोरगांवकर, स्टाफ नर्स यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे आपल्या भाषणात म्हणाले, परिचारिकांकडे प्रचंड प्रमाणात ज्ञान आणि अनेक वैविध्यपूर्ण कौशल्ये असतात ज्यांना ते परिपूर्ण आणि विकसित करण्यासाठी अनेक वर्षे घालवतात, सर्व वेळ निश्चितपणे कठीण वातावरणात काम करतात जेथे अत्यंत तणाव हा केवळ कामाचा एक भाग असतो. पाहुण्यांनी या उपक्रमाबद्दल पणजी जायन्ट्स ग्रुपचे कौतुक केले. सुरवातीला ग्रुपचे अध्यक्ष राजू चोडणकर यांनी पाहुण्यांचे आणि सत्कार्मुर्तीचे स्वागत केले. सत्कार्मुर्तीनी आपले मनोगत मांडले. या कार्यक्रमाला ग्रुपचे इतर सदस्य राजेंद्र कामत, उमेश प्रभुगावकर, नाझरेत वाझ, बिपीन कारापूरकर, रोहिदास वायंगणकर उपस्तित होते. भालचंद्र आमोणकर यांनी सूत्रसंचालन तर राजेश कामत तारकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सत्कार्मुर्तीचे नातेवाईक आणि हितचिंतक हजर होते.
फोटो caption.
विंदा कोरगावकर, अलका नायक, संध्या बांदकर, राजश्री नाईक, ओसलिंडा वाझ (पहिली रांग ) नाझारेत वाझ, प्रमुख पाहुणे डॉक्टर जुझे डिसा, अध्यक्ष राजू चोडणकर, राजेंद्र कामत (मधली रांग ) बिपीन कारापूरकर, उमेश प्रभुगावकर, रोहिदास वायगणकर, राजेश कामत तारकर आणि भालचंद्र आमोणकर (मागची रांग )
धन्यवाद
जायन्ट्स ग्रुप ऑफ पणजी